eknath shinde devendra fadnavis bhagatsingh koshyari esakal
महाराष्ट्र बातम्या

CM Eknath Shinde: कोश्यारी प्रकरणावरुन शिंदे गटाची नाराजी जाहीर; त्यांना कुठंही पाठवा...

संतोष कानडे

मुंबईः राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल दुसऱ्यांदा वादग्रस्त विधान केलं आहे. त्यामुळे शिंदे गट नाराज असल्याची शक्यता आहे. शिंदे गटातल्या एका आमदाराने यासंबंधी जाहीर भूमिका मांडली आहे.

एकनाथ शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांनी कोश्यारी यांच्याविरोधात जाहीरपणे भूमिका घेतली आहे. त्यांना कुठेतरी बाहेर पाठवा, अशी मागणी त्यांनी केलीय.

''राज्यपालांनी हे लक्षात घेतलं पाहिजे की, शिवाजी महाराजांचे विचार कधी जुने होणारे नाहीत. शिवाय त्यांची तुलना जगातल्या कोणत्याही महान व्यक्तीशी होऊ शकत नाही. केंद्रातल्या भाजप नेत्यांनी अशा राज्याचा इतिहास माहिती नसलेल्या व्यक्तीला राज्याच्या बाहेर कुठंही पाठवावं.'' अशी मागणीच बुलडाण्याचे आमदार संजय गायकवाड यांनी केली आहे. त्यामुळे कोश्यारी प्रकरणावरुन शिंदे गट नाराज असल्याचं दिसून येत आहे.

हेही वाचाः गरज आहे पंढरपूर पुन्हा समतेचे पीठ होण्याची....

औरंगाबाद येथे बोलतांना भगतसिंग कोश्यारी यांनी नितीन गडकरी यांची तुलना थेट छत्रपती शिवाजी महाराज यांच्याशी केली. ते म्हणाले की, तुम्हाला कुणी विचारलं की तुमचे हिरो कोण आहेत? तर बाहेर कुठे जायची गरज नाही. इथेच महाराष्ट्रात तुम्हाला ते मिळतील. शिवाजी तर जुन्या काळातले आहेत, मी नव्या युगाविषयी बोलतोय. डॉक्टर आंबेडकरांपासून डॉ. नितीन गडकरींपर्यंत तुम्हाला ते इथेच मिळतील. असं कोश्यारी म्हणाले. त्यानंतर राज्यभरामध्ये संताप व्यक्त होतोय.

महाविकास आघाडीच्या वतीने राज्यपालांची हकालपट्टी करण्याची मागणी होत आहे. राष्ट्रवादी काँग्रेसने याबाबत देशाच्या राष्ट्रपतींना पत्र पाठवलं आहे. त्यातच आता शिंदे गटातील आमदाराने जाहीर भूमिका मांडल्याने भाजप नेते काय निर्णय घेतात, याकडे लक्ष लागलं आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

कॅब लवकर हवी? आता आधीच टिप देण्याचा खेळ संपला! सरकारचा Uber-Ola ला मोठा आदेश

Gelatin Blast: पुण्यातल्या कामगाराचं भयंकर कृत्य! कमरेला स्फोटकं बांधून सासरवाडीत पोहोचला, एक बटण दाबलं अन् सगळं संपलं

Onion Rate : मंचर बाजार समितीत कांद्याला दहा किलोस मिळाला ४११ रुपये उच्चांकी बाजार भाव

Sangli Accident: रेणावी घाटात काळाचा घाला! दोन एसटी बस समोरासमोर धडकल्या, तीन जणांचा मृत्यू, काही जखमी

Pune News : प्रशासनातील वाद चव्हाट्यावर! वरिष्ठ अधिकारी दुजाभाव करतात; महापालिका आयुक्तांकडे तक्रार

SCROLL FOR NEXT