ShambhurajDesai-ChandrakantPatil
ShambhurajDesai-ChandrakantPatil esakal
महाराष्ट्र

'तुम्ही काय सांगता, भाजपचे खासदार आमच्याच जिवावर निवडून आलेत'

उमेश बांबरे

'भाजप नेत्यांनी महाविकास आघाडी सरकार पडणार असं सांगून अनेक तारखा दिल्या; पण..'

सातारा : भाजपच्या (BJP) नेत्यांनी महाविकास आघाडीचं सरकार (Mahavikas Aghadi Government) पडणार असं सांगून अनेक तारखा दिल्या; पण सरकार पडलेलं नाही. दोन वर्षांत राज्यावर अनेक संकटं आली; पण उद्धव ठाकरेंच्या (Uddhav Thackeray) नेतृत्वाखाली आम्ही या संकटांचा सामना करत यशस्वी वाटचाल केलेली आहे. जिल्ह्यात येऊन स्वतःला आलेल्या नैराश्येपोटी भाषणात वल्गना करायच्या, हे चुकीचं असून आम्ही पक्षीय पातळीवरून त्याचा गावागावांतून समाचार घेऊ. तुमचेही संसदेत एकेकाळी दोनच खासदार होते. तुम्ही मित्र पक्षांची मदत घेऊन केंद्रात सत्ता स्थापन केली होती. त्या वेळी भाजपचे जे खासदार निवडून आलेत तेही आमच्याच जिवावर आलेले होते, असा टोला गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई (Shambhuraj Desai) यांनी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांना लगावला.

फलटणातील कार्यक्रमात भाजपचे प्रदेशाध्यक्ष पाटील यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली होती. त्यांच्या टीकेला देसाई यांनी पत्रकार परिषदेत प्रतिउत्तर दिलंय. ते पुढे म्हणाले, आगामी निवडणुकांत बहुतांशी ठिकाणी पक्षाच्या चिन्हावर व स्वबळावर लढत आहोत. एखाद्या ठिकाणी इतर पक्षांना एखादी जागा सोडावी लागली तर त्याचा अधिकार स्थानिक जिल्हा प्रमुखाला दिलेला आहे. लवकर बरे होऊन उद्धव ठाकरे यांनी राष्ट्रीय राजकारणात सक्रिय व्हावे, हे खासदार संजय राऊत यांचे म्हणणे शंभर टक्के बरोबर आहे. ही सर्व शिवसैनिकांचीही धारणा आहे. देशभरातील शिवसैनिक (Shivsena) त्यासाठी नक्की झटणार आहेत. मुख्यमंत्र्यांचे नेतृत्व सर्वसामान्य माणसाच्या घरात पोचलेलं आहे. शांत, संयमी, दूरदृष्टी असलेल्या नेतृत्वाच्या आम्ही पाठीशी उभे आहोत. चंद्रकांतदादांनी त्यांची चिंता करू नये, असा टोलाही देसाईंनी लगावला.

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray) यांच्या बोटाला धरूनच भाजप महाराष्ट्रात पुढे आला. या पक्षाला ग्रामीण भागात जागा करून देण्याचे काम शिवसैनिकांनी केले आहे. त्याचा विसर चंद्रकांतदादांना पडला असून, ते जिल्ह्यात येऊन स्वतःला आलेल्या नैराश्येपोटी वल्गना करत आहेत. दरम्यान, रामराजेंच्या शब्दावर माझा विश्वास नाही. त्यामुळं जिल्हा बॅंकेत स्वीकृत संचालक होण्याची माझी इच्छा नाही, असेही ते म्हणाले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

HSC Exam Result : बारावीचा निकाल २.१२ टक्क्यांनी वाढला; कोकण विभागाचा सर्वाधिक ९७.५१

Narendra Modi : ... तर नेहरूंनी आरक्षणच दिले नसते

Pune News : विशाल अग्रवालसह चार जणांना अटक

Azamgarh Loksabha Election : ‘सप’च्या बालेकिल्ल्यात दोन यादवांमध्ये लढाई; धर्मेंद्र यादव विरुद्ध दिनेशलाल निरहुआ

Milind Deora : उद्धव ठाकरेंमुळे काँग्रेस पक्ष सोडला

SCROLL FOR NEXT