Sharad Pawar And Brijbhushan Sharan Singh 
महाराष्ट्र बातम्या

तेल लावलेला पहिलवान आणि युपीचा बाहुबली; काय आहे व्हायरल फोटो मागचं रहस्य

मनसेने ट्विट केलेला शरद पवार आणि बृजभूषण सिंह यांचे फोटो सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. काय आहे त्याच्या मागची कहाणी?

Kiran Mahanavar

मनसेने ट्विट केलेला शरद पवार आणि बृजभूषण सिंह यांचे फोटो सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. अयोध्या दौऱ्याला विरोध करण्यासाठी महाराष्ट्रातून रसद पुरवली जात आहे. असा आरोप राज ठाकरे यांनी पुण्यातील सभेत केला . पण राज यांनी कोणत्याही राजकीय पक्षाचं नाव घेतल नाही. मात्र आता मनसे नेत्यांकडून काही फोटो ट्विटरवर शेअर करण्यात आले. या फोटोची राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा होत आहे.

राज ठाकरेंच्या दौऱ्याला विरोध करणारे भाजप खासदार बृजभूषण सिंह या फोटोत शरद पवार आणि सुप्रिया सुळे यांच्या बरोबर दिसत आहे. फोटो हा तीन वर्षांपूर्वीचा आहे. बृजभूषण सिंह गेल्या अनेक वर्षांपासून भारतीय कुस्ती महासंघांचे राष्ट्रीय अध्यक्ष आहेत. शरद पवार हे राज्य कुस्तीगीर संघटनेचे अध्यक्ष आहेत. मनसे नेत्याने शेअर केलेले फोटो कुस्ती स्पर्धेतील असल्याचं दिसत आहे. ‘सन्मान लाल मातीचा… बहुमान मावळ वासियांचा’ असं या फोटोतील बॅनरवर लिहिलेलं दिसत आहे.तेल लावलेला पहिलवान ओळख असलेल्या शरद पवार यांच कुस्तीशी नातं काय ?

कुस्ती मध्ये शरद पवार याची जुने संबंध आहे. त्यांच्या घरात, गावात पूर्वीपासून कुस्तीचे संस्कार झाले होते त्यामुळे पवारांचे देखील कुस्तीवर प्रेम होते. त्यांनी लहानपणी कुस्ती खेळली होती का याचे मात्र पुरावे मिळत नाही. मात्र शरद पवार हे राजकारणात सक्रिय झाल्यापासून म्हणजेच तब्बल १९७० पासून कुस्तीच्या व पैलवानांच्या पाठीशी उभे आहेत. १९७१-७२ ला मुंबई तालीम संघाचे अध्यक्ष होते व आज ते महाराष्ट्र कुस्तीगीर परिषदेचे अध्यक्ष आहेत. राज्य मंत्रिमंडळात ते १९७२ ला अर्थ व क्रीडा राज्यमंत्री असताना, महाराष्ट्रातील मल्लांचा संघ तेहरान येथील आंतरराष्ट्रीय कुस्ती स्पर्धेला निघाला होता. पण आंतरराष्ट्रीय पातळीवरची कुस्ती मॅटवर खेळली जाते. आपल्याकडची पारंपरिक कुस्ती मातीतली आहे. आता मातीतली कुस्ती ही गादीवर खेळायची, यावरून संघर्ष सुरु झाला. पण आंतरराष्ट्रीय पातळीवर आपलं नैपुण्य प्रस्थापित करायचं असेल, तर गादीवरच्या कुस्तीला पर्याय नव्हता. मग महाराष्ट्राच्या क्रीडा खात्यातून जिल्ह्या-जिल्ह्यात गाद्या उपलब्ध करून देण्यासाठी निधीची शरद पवार तरतूद केली. कुस्ती असो की पैलवानांच्या जीवनातील व्यक्तिगत अडचण असो; पवार साहेबांकडे गेल्यावर काहीतरी मदत नक्की होणार, हा विश्वास कायमच वाटत आला आहे. त्याने राजकारण एका बाजूला आणि क्रीडा श्रेत्र एका बाजूला ठेवले.

युपीचे बाहुबली बृजभूषण सिंह आणि कुस्ती

निरोगी शरीराची विचारसरणी असलेले बृजभूषण शरण सिंह यांना लहानपणापासूनच कुस्तीची आवड होती आणि त्यांनी वयाच्या 10 व्या वर्षापासून घरात आखाडा बांधून कुस्तीचा सराव सुरू केला. जसजसे ते मोठे होत होते तसतसे त्याने आपल्या आजूबाजूच्या तरुणांनाही कुस्तीशी जोडायला सुरुवात केली. कुस्तीत तर त्यांनी नाव कमावलच पण पुढे ते राजकारणात देखील गाजू लागले. रॅम मंदिर आंदोलनात मिळलेल्या लोकप्रियतेमुळे खासदारकीची निवडणूक जिंकली. पुढे उत्तर प्रदेश कुस्ती संघाचे अध्यक्ष झाले. त्यानंतर राष्ट्रीय स्तरावर कुस्तीवर भर देली. 2008 मध्ये आंतरराष्ट्रीय कुस्ती महासंघाचे अध्यक्ष झाले. ऑलिम्पिकमध्ये कुस्ती क्षेत्रातून 3 पदके मिळवून दिले. खेळाडूंच्या लहान-मोठ्या सर्व समस्या सोडवण्यात मग्न असलेले ब्रिजभूषण शरण सिंह कुस्तीमध्ये लोकप्रिय झाले.

आता मुख्य प्रश्न उरला की शरद पवार आणि बृजभूषण सिंह यांच्या फोटोचा

तर सुप्रिया सुळे यांच्या २०१८ मधल्या पोस्ट मध्ये म्हणतात, भारतीय कुस्ती संघ आणि नगरसेवक मयूर कलाटे व राष्ट्रवादीचे पुणे युवक अध्यक्ष सचिन घोटकुले यांनी पुण्यात आयोजित केलेल्या मातीतील वरिष्ठ गटाच्या पहिल्या राष्ट्रीय कुस्ती स्पर्धेस उपस्थित होते. यावेळी हरियाणाच्या विशाल कुमार यांनी चांदीची गदा मिळवत स्पर्धा जिंकली, असंल्याचं त्यांनी म्हटलं होतं.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Uddhav Thackeray Video: उद्धव ठाकरेंचा जुना व्हिडीओ व्हायरल; 'जय गुजरात'चा दिला होता नारा

Sushil Kedia Tweet: देवेंद्रजी आणि अमितजी मला वाचवा! माझ्याविरोधात मोठी मोहीम...; सुशील केडियांची संरक्षणासाठी धाव

Bank of Baroda Recruitment: पदवीधरांसाठी नोकरीची सुवर्णसंधी! बँक ऑफ बड़ौदामध्ये 2500 पदांसाठी भरती सुरु; जाणून घ्या अर्ज प्रक्रिया, निवडपद्धत आणि वेतन

Pune Kondhwa Rape Case : पुणे 'कुरियर बॉय' बलात्कार प्रकरण; आरोपीस अटक अन् धक्कादायक माहितीही उघड!

IND vs ENG 2nd Test: २४ वर्षांच्या पोराचे शतक! जेमी स्मिथ-हॅरी ब्रूक्सच्या खेळीने इंग्लंडचा पलटवार; गौतम गंभीरचा फसला प्लॅन

SCROLL FOR NEXT