sharad pawar 
महाराष्ट्र बातम्या

Sharad Pawar: शरद पवारांच्या निवृत्तीला कार्यकर्त्यांचा विरोध! घोषणाबाजीनं दणाणून सोडलं सभागृह

'लोक माझे सांगाती' या शरद पवारांच्या आत्मचरित्राच्या प्रकाशनप्रसंगी भाषणात पवारांनी राजकीय निवृत्तीची घोषणा केली.

Amit Ujagare (अमित उजागरे)

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार यांनी राजकीय जीवनातून मंगळवारी निवृत्तीची घोषणा केली. त्यांच्या या घोषणेनंतर यशवंतराव चव्हाण सेंटरमधील सभागृहात कार्यकर्त्यांनी विरोध केला. यावेळी त्यांनी शरद पवार, शरद पवार अशा घोषणांनी सभागृह दणाणून सोडलं. यावेळी अनेक कार्यकर्ते भावूक झाले होते.

'लोक माझे सांगाती' या शरद पवार यांच्या आत्मचरित्राच्या सुधारित आवृत्तीचं आज प्रकाशन झालं. यावेळी पवारांनी आपले राजकीय जीवनातील आता तीन वर्षे शिल्लक असून यानंतर आण राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या प्रमुखपदावरुन निवृत्त होणार असून राजकारणातूनही निवृत्ती घेणार असल्याची घोषणा केली. शरद पवारांनी ही घोषणा करताच सभागृहात उपस्थित असलेल्या राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी त्यांच्या या निर्णयाला विरोध दर्शवत शरद पवारांच्या नावानं घोषणाबाजी करायला सुरुवात केली. यामुळं काही काळ सभागृहात गोंधळाचं वातावरण निर्माण झालं होतं.

महाराष्ट्राचे ज्येष्ठ नेते आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार यांच्या लोक माझे सांगाती या आत्मचरित्राच्या दुसर्या भागाचं प्रकाशन नुकतचं यशवंतराव चव्हाण सेंटरमध्ये पार पडलं. यावेळी शरद पवार, त्यांच्या पत्नी प्रतिभा पवार, खासदार सुप्रिया सुळे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. पवारांनी आपल्या या आत्मचरित्रातून महाविकास आघाडीसह नंतरच्या राजकीय घडामोडींवरही यात भाष्य करण्यात आल्याचं सूत्रांकडून सांगितलं जात आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Illegal Immigrants India : नक्षलवादानंतर आता घुसखोरांवर सर्जिकल स्ट्राईकची तयारी, अमित शहा यांनी बोलावली मोठी बैठक

Civic Works Halted: मतदार यादी पडताळणीमुळे पथ व भवन विभागाची कामे ठप्प; अभियंत्यांना मोहिमेतून मुक्त करण्याची जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी

Sourav Sonawane news: 'सोनवणेंना अटक करा', घुले कुटुंबीय थेट पाण्याच्या टाकीवर चढले

Shrikant Shinde चा ताफा अडवला, काळे झेंडे दाखवत शिवसैनिकांकडून जोरदार घोषणाबाजी

Kolhapur Crime: मुलगा की मुलगी? कोल्हापुरात गर्भलिंग निदानचा पर्दाफाश, चौघे ताब्यात; ३० हजार दर

SCROLL FOR NEXT