महाराष्ट्र बातम्या

Sharad Pawar: PM मोदींचे नाव न घेता शरद पवारांची टीका; म्हणाले मंदिर-मशिदींचे...

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या विस्तारित राष्ट्रीय कार्यकारिणी समितीची बैठक पार पडली

सकाळ डिजिटल टीम

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या विस्तारित राष्ट्रीय कार्यकारिणी समितीची बैठक पार पडली. नवी दिल्लीतील कॉन्स्टिट्यूशन क्लब येथे पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांच्या अध्यक्षतेखाली हि बैठक पार पडली. शनिवारी पक्षाच्या बैठकीत शरद पवार यांची पुन्हा राष्ट्रवादीच्या अध्यक्षपदी वर्णी लागली. आज अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी शरद पवारांनी अनेक मुद्द्यांवर भाष्य केलं. भाषणवेळी ते म्हणाले की, काही लोक शपथ घेतल्यानंतर मंदिर-मशिदींचे मुद्दे काढून देशाला धोक्यात टाकतात असं म्हणत पवारांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच नाव न घेता टीका केली आहे.

शरद पवारांनी आपल्या भाषणामधून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर नाव न घेता टीका केली. शरद पवार म्हणाले की, काही सांप्रदायिक तत्व समाजात तेढ निर्माण करत आहेत.त्याचप्रमाणे स्वतंत्रता बंधुत्व याचं रक्षण केलं पाहिजे असंही शरद पवार यावेळी म्हणाले आहेत.

देशातील महागाईबाबतही त्यांनी केंद्र सरकारवर निशाणा साधलाय. आपल्याकडे महागाई वाढली आहे. 410 रुपयांचा गॅस आज 1 हजार रुपयांच्या वर गेला आहे. पेट्रोल-डिझेलचे दर वाढले आहेत. रोजगाराच्या संधी निर्माण झाल्या नाही अशी टीका त्यांनी केंद्र सरकारवर टीका केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

साहील मृत्यू प्रकरणात नवा ट्विस्ट! परीक्षेदरम्यान प्राध्यापकांनी बाजूला नेलं अन्..., CCTV फुटेज समोर, 15 मिनिटांत काय घडलं?

Junnar News : शासकीय आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांनी शिष्यवृत्ती परीक्षेत उल्लेखनीय कामगिरी करत घवघवीत यश संपादन केले.

लहानपणीचं गाणं आजही तोंडपाठ आहे, पण कालचा अभ्यास लक्षात राहत नाही; असं का? जाणून घ्या मेंदूचं रहस्य

Marathi News Live Updates: धाराशिवमध्ये पावसाला सुरुवात

DPL Fixing Controversy: दिल्ली प्रीमियर लीगमध्ये फिक्सिंगचा संशय? वंश बेदीकडे क्रिकेटपटूचा संपर्क; लगेच दिली अँटी करप्शनला माहिती

SCROLL FOR NEXT