Sharad Pawar and Chandrakant Patil 
महाराष्ट्र बातम्या

पहाटेचा शपथविधी पवारांची खेळी? NCPच्या दाव्यावर चंद्रकांत पाटील म्हणाले, त्यावेळी...

सकाळ डिजिटल टीम

पुणे - भाजपनेते देवेंद्र फडणवीस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी २०१९ मध्ये पहाटेच मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली होती. या शपथविधीबाबत राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी मोठं विधान केलं. त्यामुळे राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे. यावर चंद्रकांत पाटील यांची प्रतिक्रिया आली आहे. (Chandrakant Patil news in Marathi)

चंद्रकांत पाटील म्हणाले की, जयंत पाटील यांनी दावा केलाय की पहाटेचा शपथविधी शरद पवारांची खेळी असू शकते. असे गौप्यस्फोट जयंत पाटील त्याचवेळा का करत नाहीत, असा प्रश्न पाटील यांनी उपस्थित केला. तसेच उशिरा सुचलेलं शहाणपण काहीच महत्त्वाचे नाही, असंही पाटील म्हणाले.

बाबासाहेब आंबेडकर यांना घटनास्थापन करण्याची जबाबदारी दिली होती. २६ जानेवारी रोजी आपण ती स्वीकारली. काही झाल्यावर, काय करावं हे त्यांनी लिहलंय. त्यामुळे आतापर्यंत घटनात्मक पेच निर्माण झाला नाही.

यावेळी चंद्रकांत पाटील यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं कौतुक केलं. पाटील म्हणाले, देवेंद्रजी अलीकडे राज्यातील असे नेते झाले की लहान वयात त्यांनी विश्वास निर्माण केला. ते माहिती नसताना काहीच बोलत नाहीत. माझ्या सारख्या लोकांनी त्यांच्याकडून शिकले पाहिजे. मी काहीतरी बोलतो आणि नंतर दिलगिरी व्यक्त करतो, अशी कबुलीही पाटील यांनी दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

संत सखाराम महाराज संस्थानाला भीषण आग; शॉर्ट सर्किटमुळे दुर्घटना, भाविकांना तातडीने बाहेर काढलं...

Sachin Ahir: उपसभापतिपदाची प्रतिष्ठा वाढवेन: सचिन अहिर यांची ग्वाही; कष्टकरी, कामगार, महाराष्ट्राशी बांधिलकी सोडणार नाही!

IND vs ENG: वैभव सूर्यवंशीला संधी नाहीच, स्टार खेळाडूचे कमबॅक; पहिल्या T20I साठी कशी आहे Playing XI?

सौरऊर्जा मीटर जोडणीच्या ऑर्डरसाठी घेतली ४ हजार रुपयांची लाच; सहायक अभियंत्याला रंगेहात पकडलं...

Pune News: आई-वडिलांवरच अत्याचार! एकुलत्या एक मुलाविरोधात ५८ वर्षीय मातेचा लढा; न्यायालयाचे कडक आदेश..

SCROLL FOR NEXT