Sharad Pawar Esakal
महाराष्ट्र बातम्या

Sharad Pawar: अजित पवारांच्या निर्णयानंतर शरद पवार अ‍ॅक्शन मोडमध्ये; दिल्लीत बोलावली राष्ट्रीय कार्यकारणीची बैठक

आज राष्ट्रवादीच्या राष्ट्रीय कार्यकारणीची दिल्लीत बैठक बोलावली आहे

अंकिता खाणे (Ankita Khane)

राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये अजित पवार यांनी घेतलेल्या निर्णयामुळे उभी फूट पडली आहे. त्यानंतर आता पक्षाचे अध्यक्ष शरद पवार अॅक्शन मोडमध्ये आले आहेत. पवारांनी पक्षातील पदाधिकारी, आमदारांसोबत चर्चा सुरू केली आहे. काल मोठी बैठक घेतली. पुन्हा नव्याने पक्षबांधणीसाठी ते सज्ज असल्याचे त्यांनी काल बैठकीत बोलताना सांगितले. तर, आपल्या राज्यभर दौऱ्याचीही आखणी करण्यास सुरुवात केली आहे.  (Marathi Tajya Batmya)

काल आमदार, खासदार, राज्य कार्यकारणी, पदाधिकाऱ्यांच्या बैठकीनंतर आज गुरुवारी 6 जुलै रोजी राष्ट्रीय कार्यकारणीची बैठक होणार आहे. पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी दिल्लीत राष्ट्रीय कार्यकारणीची बैठक बोलावली आहे. (Latest Marathi News)

पक्षातल्या अंतर्गत मोठ्या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर शरद पवारांनी ही महत्वाची बैठक बोलावली आहे. पक्षावर पकड कायम ठेवण्यासाठी पवारांकडून मोठी पावले उचलली जात आहेत. दिल्लीत होणाऱ्या याच वर्किंग कमिटीमध्ये पक्षाच्या घटनेच्या दृष्टीने, संघटनेतल्या बदलांच्या दृष्टीने महत्त्वाचे निर्णय होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहेत. (Marathi Tajya Batmya)

शरद पवार यांनी याआधीच पक्षविरोधी कारवाई केल्यामुळे पक्षाचे कार्यकारी अध्यक्ष खासदार प्रफुल्ल पटेल आणि खासदार सुनील तटकरे यांनी पक्षातुन बडतर्फ केलं आहे. त्यामुळे आता गुरुवारी 6 जुलै रोजी होणाऱ्या राष्ट्रीय कार्यकारणीत काय निर्णय होणार याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.(Latest Marathi News)

राष्ट्रवादी अध्यक्ष शरद पवार आणि कार्याध्यक्ष सुप्रिया सुळे दिल्लीला रवाना झाले आहेत. सकाळी 8 वाजता सिल्वर ओक निवासस्थानावरून मुंबई विमानतळाच्या दिशेने रवाना झाले आहेत. आज दुपारी 3 वाजता दिल्लीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची राष्ट्रीय कार्यकारणी पार पडणार आहे. अजित पवार यांनी उपमुख्यमंत्री शपथ घेतल्यानंतर पहिल्यांदा राष्ट्रीय कार्यकारणी होत आहे. (Marathi Tajya Batmya)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

सचिन अहिर यांची बिनविरोध निवड, ठाकरेंनी ऐनवेळी अर्ज का मागे घेतला? सभागृहात काय घडलं?

IND vs ENG 1st T20I पूर्वी अभिषेक शर्माला बसला मोठा धक्का; जसप्रीतबाबतही ICC कडून महत्त्वाचे अपडेट्स, नेमकं काय घडलंय?

MNS: मनसेची कल्याण-डोंबिवलीत मोठी मोर्चेबांधणी; हर्षद पाटील शहराध्यक्ष, नव्या टीमची घोषणा

Kolhapur Girl Death : हृदयद्रावक! झोका खेळताना ओढणीचा फास लागून सातवीतील विद्यार्थिनीचा मृत्यू; संसाराला हातभार लावणाऱ्या मोठ्या मुलीचा दुर्दैवी शेवट

Mumbai Local: प्रवाशांची सुरक्षा कोणाच्या भरोशावर? मुंबई लोकलमध्ये आरपीएफ आणि जीआरपी कर्मचाऱ्यांचा तुटवडा; २,५५९ पदे रिक्त

SCROLL FOR NEXT