महाराष्ट्र बातम्या

Sharad Pawar: 'त्या' लोकांना पुन्हा पक्षात नाही मिळणार प्रवेश; पवारांच्या नेत्याचे महत्वाचे विधान!

Sharad pawar Ncp : दोन महिन्यांत महाविकास आघाडीचे सरकार येणार असल्याने कुसडगाव येथील प्रशिक्षण केंद्रात सेकंड, थर्ड फेजमध्ये अनेक कामे होणार आहेत.

सकाळ वृत्तसेवा

Anil Deshmukh: कठीण काळात सोडून गेलेल्या कोणालाही परत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये घ्यायचे नसल्याचे शरद पवार यांनी सांगितले असल्याचे सांगत माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी ‘एसआरपीएफ’ प्रशिक्षण केंद्र आमदार रोहित पवारांच्या पाठपुराव्यामुळे झाल्याचे त्यांनी सांगितले.

तालुक्यातील कुसडगाव येथील ‘एसआरपीएफ’ प्रशिक्षण केंद्राचा लोकार्पण सोहळा माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या हस्ते झाले. यावेळी आमदार रोहित पवार, राष्ट्रवादीचे प्रदेश सरचिटणीस राजेंद्र कोठारी, जिल्हा बँकेचे संचालक अमोल राळेभात, माजी सभापती सूर्यकांत मोरे, बाजार समितीचे संचालक सुधीर राळेभात, तालुकाध्यक्ष विजयसिंह गोलेकर, बाजार समितीचे उपसभापती कैलास वराट, दत्तात्रय वारे, माजी सभापती संजय वराट, राजश्री मोरे आदी उपस्थित होते.

देशमुख म्हणाले, पोलिस आयुक्त परमवीरसिंह यांनी केलेल्या आरोपात तथ्य नसल्याचे या प्रकरणाची चौकशी करणाऱ्या जस्टीस चांदीवाल यांनी सांगितले आहे. मात्र, मला देवेंद्र फडणवीस यांनी त्रास देण्याच्या उद्देशातून खोटे आरोप करून १४ महिने जेलमध्ये ठेवले. फडणवीस यांनी माझ्याकडे माणूस पाठवून उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे, शरद पवार यांच्यावर आरोप करा, असे सांगितल्याची माहिती देशमुख यांनी दिली. गेल्या तीन वर्षात एक-एक आमदार ५०-५० कोटी रुपये देवून देवेंद्र फडणवीस यांनी आमदार फोडले, इडीची भीती दाखवून राष्ट्रवादी फोडल्याचा आरोप त्यांनी केला.

देशमुख म्हणाले, दोन महिन्यांत महाविकास आघाडीचे सरकार येणार असल्याने कुसडगाव येथील प्रशिक्षण केंद्रात सेकंड, थर्ड फेजमध्ये अनेक कामे होणार आहेत. या माध्यमातून येथे रोजगाराच्या संधी निर्माण होणार असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी तेलंगशी येथील भाजप कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Monsoon Rain : राज्यात पावसाचा कहर ! मुसळधार पावसाने मुंबई ठप्प, पुण्यात जनजीवन विस्कळीत; मध्य महाराष्ट्र-विदर्भात अलर्ट जारी

Pune Crime: 'Sorry Mummy' मेसेजनंतर खळबळ! 'ज्युस घेऊन येते' म्हणत घराबाहेर पडलेली अल्पवयीन बेपत्ता; चुलत भावावर गुन्हा

Konkan Nuclear project: कोकणात अणुऊर्जा प्रकल्पाचे संकेत! राज्य सरकारचे विधानसभेत स्पष्टीकरण; नेमका प्रकल्प कुठे उभारणार?

Indian Army: देशसेवकाला अखेरचा सलाम! जवान तुषार भिलारेंच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार; कुटुंबीयांचा आक्रोश काळजाला भिडणारा

Latest Marathi News Live Update : मुसळधार पावसाचा कहर, सायन-पनवेल हायवे जलमय

SCROLL FOR NEXT