Sharad Pawar, Madha MLA Baban Shinde Esakal
महाराष्ट्र बातम्या

Sharad Pawar: बालेकिल्ल्यावर पवार मिळवणार पुन्हा विजय? राजन पाटलांनंतर, आमदार बबन शिंदे दुसऱ्यांदा शरद पवार यांच्या भेटीला

Sharad Pawar Solapur: लोकसभा निवडणुकीत मोहीते-पाटील कुटुंबाला पुन्हा पक्षात आणत पवारांनी माढा पुन्हा जिंकला. आता ते सोलापूर जिल्हा पुन्हा जिंकण्यासाठी जुळवाजुळव करत आहेत.

आशुतोष मसगौंडे

गेल्या वर्षी जुलैमध्ये अजित पवार यांच्यासह 40 आमदारांनी भाजपबरोबर हातमिळवणी करत महायुती सरकारमध्ये प्रवेश केला होता. त्यानंतर पुढे शरद पवार यांना पक्षाचे नाव आणि चिन्ह गमवावे लागले होते.

पुढे झालेल्या लोकसभा निवडणुकीत नवा पक्ष आणि चिन्हासह शरद पवार यांनी दमदार यश मिळवत 8 खासदार निवडून आणले. पवार यांच्या या यशामुळे अजित पवार यांच्याबरोबर गेलेल्या आमदारांमध्ये अस्वस्थता निर्माण झाली आहे. अशात आता राष्ट्रवादीचे अनेक आमदार पुन्हा एकदा शरद पवार (Sharad Pawar) यांच्याकडे वळत असल्याचे पाहायला मिळत आहे.

दरम्यान विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर अजित पवार यांच्या राष्ट्रावादीतील अनेक आमदार शरद पवार यांच्याशी संपर्क साधत आहेत. यामध्ये सोलापूरातील राष्ट्रावादीचे आमदार आणि नेत्यांचा समावेश सर्वाधिक आहे.

काल मोहोळचे माजी आमदार राजन पाटील यांनी अकलूज येथे शरद पवार यांच्या भेट घेतल्यानंतर आज, राष्ट्रवादीचे माढ्याचे आमदार बबन शिंदे यांनी पुण्यातील मोदी बाग येथे शरद पवार यांच्या भेटीसाठी दाखल झाले आहेत.

गेल्या काही दिवसांत बबन शिंदे दुसऱ्यांदा शरद पवार यांच्या भेटीसाठी मोदी बागेत आल्याने ते उपमुख्यमंत्री अजित पावर यांची साथ सोडणार असल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे.

पवार पुन्हा जिंकणार बालेकिल्ला?

लोकसभा निवडणुकीत मोहीते-पाटील कुटुंबाला पुन्हा पक्षात आणत पवारांनी माढा पुन्हा जिंकला. तर पवार आता विधानसभेतही त्यांचा बालेकिल्ला असलेला सोलापूर जिल्हा पुन्हा जिंकण्यासाठी जुळवाजुळव करत आहेत.

यासह पक्ष सोडून गेलेले अनेकजन पुन्हा पवार यांच्या राष्ट्रवादीत येणास उत्सक आहेत. यामध्ये मोठ्या नावांचाही समावेश आहे.

दरम्यान गेल्या काही काळात पंढरपूरमधून आमदारकी लढवलेले भगिरथ भालके, मोहळचे माजी आमदार रमेश कदम, माढ्याचे आमदार बबन शिंदे, माजी आमदार राजन पाटील यांनी शरद पवार यांची भेट घेतली आहे.

हे सर्व नेते, आमदार शरद पवार यांना भेटत असल्यामुळे ते पुन्हा स्वगृही येण्याच उत्सुक असल्याचे बोलले जात आहे. जर हे सर्व नेते बरोबर आल्यास शरद पवार पुन्हा एकदा बालेकिल्ला असलेल्या सोलापूर जिल्ह्यावर विजय मिळवणार का हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Child Accident : पुण्यात भीषण अपघात! भरधाव कारने ६ दुचाकी, रिक्षाला उडवले; ४ वर्षांच्या मुलाचा मृत्यू

Akole Crime: अकोले तालुक्यात खळबळ! पाकिस्तानी ॲप कनेक्शनच्या संशयावरून चौकशी, एक चूक नडली अन् नेमकं काय घडलं..

Aditi Tatkare Mumbai Goa highway : मुंबई -गोवा महामार्गावरील टोल वसुलीला अदिती तटकरेंचा तीव्र विरोध, नितीन गडकरींची घेणार भेट

विकीच्या वाढदिवसादिवशी कतरिनाने शेअर केला विहान फोटो, विकीला म्हणाली, 'तुला शांतपणे ब्लॅक कॉफी पिण्यासाठी...' Post Viral

अश्या प्रकारच्या जल्लोष करण्यावर थेट बंदी घाला! अंबाती रायडू आयपीएलमधील 'त्या' ट्रेंडवर प्रचंड संतापला

SCROLL FOR NEXT