Sharad Pawar devendra fadnavis esakal
महाराष्ट्र बातम्या

''मी फसवलं असेल तर ते का फसले? उद्या गव्हर्नर करतो म्हणालो तर शपथ घ्यायला याल का?'', पवारांपुढे फडणवीस क्लिन बोल्ड

संतोष कानडे

मुंबईः उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी २०१९मध्ये सत्तास्थापनेसाठी शरद पवारांसोबत बैठका झाल्याचं सांगितलं होतं. परंतु नंतर दोन दिवसांनी पवारांनी निर्णय बदलल्याचं फडणवीसांनी सांगून पवारांवर आक्षेप घेतले होते. त्याला सायंकाळी शरद पवारांनी पत्रकार परिषद घेऊन जोरदार प्रत्युत्तर दिलं.

पत्रकार परिषदेदरम्यान पत्रकारांनी पवारांना फडणवीसांसोबत बैठका झाल्या का? असा प्रश्न विचारला. त्यावर बोलतांना शरद पवार म्हणाले की, भेटले ही गोष्ट खरी आहे आणि चर्चाही झाली. यासंबंधीचं धोरण मी दोन दिवसांनी बदललं, असं फडणवीस म्हणाले. मग त्याच्यानंतर दोन दिवसांनी का शपथ घेतली? त्यांना चोरुन शपथ घ्यायची काय गरज होती? आमचा पाठिंबा होता तर दोन दिवसांत सत्ता का गेली? याचा अर्थ असाय की सत्तासाठी आम्ही कुठेही जाऊ शकतो, असं त्यांचं दिसतंय, अशा शब्दांत पवारांनी जोरदार प्रत्युत्तर दिलं.

पवार पुढे म्हणाले की, मी फसवलं असेल तर ते का फसले? उद्या मी तुम्हांला सागतो गव्हर्नर करतो, या शपथ घ्यायला, याल का तुम्ही? यात मोदींचा काहीही संबंध नव्हता. आमची भेट झाली होती. आम्ही आजही भेटतो. परंतु त्यांची अस्वस्थता दिसून आली. ती महाराष्ट्रासमोर यायची गरज होती.

गुगली कसा टाकायचा ते मला माहिती

शरद पवार पुढे म्हणाले की, तेव्हाच्या परिस्थितीचा काय अर्थ काढायचाय तो काढा. हा डाव होता का काय होता, मला माहिती नाही. माझे सासरे होते, सदू शिंदे. ते देशातले उत्तम गुगली बॉलर होते. मोठमोठ्या लोकांच्या विकेट त्यांनी घेतल्या. मी जगाच्या क्रिकेटचा अध्यक्ष होतो. गुगली कसा टाकायचा आणि कुठं टाकायचा, हे माहिती होतं. मी खेळलो नसलो तरी माहिती होतं. फडणवीसांनीच विकेट दिली तर करायचं काय? विकेट घेतली पाहिजे.

यात अजित पवार हे चेंडू होते का? असं विचारण्यात आलं. ते म्हणाले की, देवेंद्र फडणवीस कुठं जाऊ शकतात, काय करु शकतात, हे दिसून आलं; बाकी काही नाही.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Indian Army: देशसेवकाला अखेरचा सलाम! जवान तुषार भिलारेंच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार; कुटुंबीयांचा आक्रोश काळजाला भिडणारा

Delhi Pollution Master Plan : दिल्लीत ५० टक्के कर्मचाऱ्यांना 'WFH' अनिवार्य, पार्किंग शुल्कातही दुप्पट वाढ; प्रदूषण नियंत्रणासाठी नवे धोरण लागू

Pune Highway Upgrade: घोडेगाव–मंचर–बेल्हे महामार्ग विकासाला ४७० कोटींचा मुबलक निधी; भीमाशंकर प्रवास २० किमीने कमी, भाविकांना मोठा दिलासा

Parbhani News: घरी परतताना काळाचा घाला! जिंतूरमध्ये पुराच्या पाण्यात वाहून गेलेल्या शेतकरी महिलेचा दुसऱ्या दिवशी मृतदेह सापडला

Nanded Accident: परभणीच्या कुटुंबावर काळाचा घाला! नांदेडमध्ये अपघातात कुटुंबप्रमुखाचा मृत्यू, पत्नी व दोन मुले गंभीर

SCROLL FOR NEXT