NCP 
महाराष्ट्र बातम्या

Sharad Pawar: शरद पवार नाराज? राऊतांच्या थुंकण्याच्या कृतीवर मांडली भूमिका

s: संजय राऊतांच्या थुंकण्याच्या कृतीवर शरद पवारांनी दिलं उत्तर

धनश्री ओतारी

राज्यातील राजकारणात घडामोडींना वेग आला आहे. अशातच संजय राऊत यांनी एका पत्रकार परिषदमध्ये श्रीकांत शिंदेंचे नाव ऐकताच थुंकलं. त्यामुळे राज्यात नव्या वादाला तोंड फुटलं आहे. त्यांच्या या कृतीवर संमीश्र प्रतिक्रिया येत आहेत. दरम्यान, राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांनी आपली भूमिका मांडली आहे. त्याच्या विधानांमध्ये नाराजीचा सूर पाहायला मिळाला. (Sharad Pawar on Sanajy Raut split camera shrikant shinde maharashtra politics)

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार पुण्याच्या दौऱ्यावर आहेत. महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेच्या सभेनंतर माध्यमांशी बोलत होते. संजय राऊत थुंकल्याबाबत प्रश्न विचारला असता शरद पवारांनी स्पष्टपणे बोलण्यास नकार दिला. ते म्हणाले, “हे काही राष्ट्राचे, राज्याचे प्रश्न नाहीत. मी त्यावर भाष्यदेखील करू इच्छित नाही आणि त्याला महत्त्वही देऊ इच्छित नाही.

नेमकं काय आहे प्रकरण?

संजय राऊत यांना पत्रकार परिषदेत खासदार श्रीकांत शिंदे यांच्याबाबत प्रश्न विचारल्यार ते थुंकल्याने वाद निर्माण झाला आहे. यावर अजित पवार यांनी प्रत्येकानं तारतम्य ठेवून वागावं असा सल्ला राऊतांना दिला होता. अजित पवारांच्या सल्ल्यानंतर संजय राऊतांनी अजित पवारांवर टीका करत धरणामध्ये **** पेक्षा थुंकणं कधी चांगलं, असं म्हटलं होतं.

त्यांच्या या कृत्यावरून राज्याचं राजकारण तापलेलं दिसत आहे. या वादानंतर संजय राऊतांनी जीभेचा त्रास असल्याचं सांगत त्यावर स्पष्टीकरणही दिलं

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Overhead Cable : ओव्हरहेड केबल धोरणाला स्थायीची मान्यता; अनधिकृत केबल वर्षभरासाठी होणार नियमित

'ऑपरेशन टायगर'चा दुसरा भाग खरंच येणार? मंत्री प्रताप सरनाईक यांचा दावा की मिश्किल टिपण्णी? कैलास पाटलांबद्दल काय म्हणाले?

RBI चा मोठा निर्णय! 'ही' सुविधा वेळेआधी होणार बंद; ग्राहकांसाठी काय बदलणार? जाणून घ्या...

Ajinkya Rahane Exclusive : अजिंक्यचे भारताकडून खेळण्याचे स्वप्न पूर्ण होईल की नाही, याची भीती होती.. पण तो खचला नाही! राधिकाचे डोळे भरून आले, रहाणेने सावरले...

Devendra Fadnavis: महाराष्ट्रातील ३६,२११ कंपन्या बंद झाल्या? चर्चेवर देवेंद्र फडणवीसांचा खुलासा; शरद पवारांना सांगितलं सत्य

SCROLL FOR NEXT