Sharad Pawar Sakal
महाराष्ट्र बातम्या

Sharad Pawar : मविआची पत्रकार परिषद, ठाकरेंच्या शेजारी बसलेल्या पवारांच्या फोनमधून अजित पवारांचा आवाज? काय आहे प्रकरण?

फोनमधून आवाज आल्यानंतर त्यांच्याकडे सर्व नेत्यांच्या नजरा गेल्या.

दत्ता लवांडे

मुंबई : उद्या मुंबईत विरोधी पक्षांच्या इंडिया या आघाडीची बैठक पार पडणार आहे. त्याच्या तयारीची माहिती देण्यासाठी महाविकास आघाडीच्या नेत्यांनी आज मुंबईत पत्रकार परिषद घेतली. यावेळी उद्धव ठाकरे बोलत असताना शरद पवार यांनी हातात फोन घेतला आणि त्यांच्या फोनमधून अजित पवारांचा आवाज आला, त्यामुळे बाकीच्या नेत्यांचेही पवारांकडे लक्ष गेले.

दरम्यान, पत्रकार परिषदेत उद्धव ठाकरे बोलत होते. यावेळी समोरच्या टेबलावर ठेवलेला फोन पवारांनी हातात घेतला अन् त्यांच्या फोन मधून अजित पवार यांचा आवाज येऊ लागला. हा आवाज आल्यानंतर उद्धव ठाकरे यांच्या बाजूला बसलेले नाना पटोले, दुसऱ्या बाजूला बसलेले आदित्य ठाकरे आणि जयंत पाटील यांचे पवारांकडे लक्ष गेले आणि त्यांनी पवारांकडे कटाक्ष टाकला.

हे पवारांच्या लगेच लक्षात आले आणि त्यांना फोन पुन्हा ठेवून दिला. पण माध्यमामध्ये याच्या जोरदार चर्चा रंगल्या आहेत. शरद पवारांच्या फोनमध्ये अजित पवारांचा आवाज कसा आला? असा प्रश्न आता उपस्थित झाला आहे.

इंडिया आघाडीच्या बैठकीसाठी ११ राज्याचे मुख्यमंत्री

३१ ऑगस्ट आणि १ सप्टेंबर रोजी मुंबईत इंडिया आघाडीच्या होणाऱ्या बैठकीला भाजपेतर सत्ता असलेल्या ११ राज्यातील मुख्यमंत्री हजर असणार आहेत. त्याचबरोबर छोट्यामोठ्या अनेक विरोधी पक्षांचे नेतेसुद्धा या बैठकीला हजार असणार आहेत. महाराष्ट्रातील विरोधी आघाडी असलेल्या महाविकास आघाडीने या बैठकीचे आयोजन केले आहे.

पत्रकार परिषदेत भाजपवर निशाणा

भाजपला शह देण्यासाठी इंडिया आघाडी स्थापन केली असून या आघाडीची उद्या बैठक आहे. तर आज महाविकास आघाडीकडून घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत भाजपवर निशाणा साधण्यात आला आहे. संजय राऊत, नाना पटोले, उद्धव ठाकरे यांच्याकडून भाजपवर जोरदार टीका करण्यात आली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Team India: 'गौतम गंभीरचे अनेक शत्रू, ५ सिलेक्टर्सपैकी ४ जणं....' माजी संघसहकाऱ्याचं खळबळजनक दावा

8th Pay Commission: सरकारी कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर! 8व्या वेतन आयोगात ₹69,000 किमान वेतनासह जुनी पेन्शन योजनेचा प्रस्ताव

Petrol Diesel Rates update : पेट्रोल -डिझेल महागणार, सर्वसामान्यांच्या खिशाला मोठा फटका

खऱ्या आयुष्यातही सगळ्यांशी तुसडेपणाने वागतो समीर परांजपे; बायकोचा खुलासा, म्हणाली, 'आताची भूमिका सेम टू सेम'

Latest Marathi News Live Update: अश्विनी चेनानीला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली

SCROLL FOR NEXT