Rahul Gandhi and Sharad Pawar  
महाराष्ट्र बातम्या

Sharad Pawar : विरोधकांच्या ऐक्यासाठी राहुल यांच्या पदयात्रेची मदत होईल; पवारांचं सूचक विधान

सकाळ डिजिटल टीम

कोल्हापूर - काँग्रेसनेते राहुल गांधी यांच्या नेतृत्वात सध्या भारत जोडो यात्रा सुरू आहे. ही यात्रा काही दिवसांपूर्वीच महाराष्ट्रातून गेली आहे. भारत जोडो यात्रा सध्या उत्तर प्रदेशात आहे. कन्याकुमारीपासून सुरू झालेली भारत जोडो यात्रा काश्मीरपर्यंत जाणार आहे. त्यातच या यात्रेबाबत आणि २०२४ मधील विरोधकांच्या ऐक्याबाबत शरद पवार यांनी मोठं विधान केलं आहे. (Sharad Pawar news in Marathi)

शरद पवार म्हणाले की, राहुल गांधींविषयी सत्ताधारी भाजपने कायमच टिंगलटवाळी केली. मात्र राहुल यांनी भारत जोडो यात्रेचा कार्यक्रम हाती घेतली. त्यावरही सुरुवातीला टीका झाली. मात्र हा कार्यक्रमात केवळ काँग्रेस पक्षाचाच आहे, असं काही मर्यादित ठेवलं नाही. सर्व पक्ष या यात्रेत सामील झाले. महात्मा गांधींच्या विचारांनी काम करणाऱ्या संस्था यात सामील झाल्या होत्या. विशेष म्हणजे, भारत जोडो यात्रेत सामान्य माणूस देखील पोहोचला होता. यात्रेला सामान्यांची सहानुभुती होती. या यात्रेमुळे भाजपला प्रत्युत्तर मिळाल्याचं पवार यांनी सांगितलं.

केरळपासून काश्मीरपर्यंतचा जायचा कार्यक्रम राहुल गांधी राबवत आहेत. माझ्या मते विरोधकांची एकवाक्यता होताना राहुल गांधी यांच्या पदयात्रेची मदत होईल, असंही शरद पवार यांनी म्हटलं.

यावेळी पवार यांनी महाविकास आघाडीबाबत मोठं विधान केलं. आगामी काळात काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि ठाकरे गट मिळून एकत्र निवडणूक लढवू, अस शरद पवार यांनी म्हटलं. ते कोल्हापुरात माध्यमांशी बोलत होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

India-New Zealand FTA: 20 ऑक्टोबरपासून दारू होणार स्वस्त! भारत-न्यूझीलंड FTA मुळे तुम्हाला काय फायदा?

Tempo Bike Accident : भरधाव वेगाने जाणाऱ्या टेम्पोने दोन मोटारसायकलला पाठीमागुन उडविल्याने एक जणाचा मृत्यू; तर एकजण जखमी

Marathi News Live Updates: पाण्याची टाकी पाडताना जखमी झालेल्या कामगाराचा उपचारादरम्यान मृत्यू

Pitru Paksha 2026: यंदा पितृ पंधरवडा कधीपासून सुरू होणार? जाणून घ्या महत्त्वाच्या तिथी

Marathwada Drought : पावसाने पाठ फिरवली; शेतकरी हवालदिल;सोयाबीनला पाणी देण्याची धडपडही निष्फळ; आर्थिक संकट गडद

SCROLL FOR NEXT