Sharad Pawar Sakal
महाराष्ट्र बातम्या

Sharad Pawar Resigns : 'तुमचा राजीनामा आम्ही नामंजूर करतो'; शरद पवारांच्या निवृत्तीवर छगन भुजबळांची घोषणा

दत्ता लवांडे

मुंबई : राष्ट्रवादीचे खासदार शरद पवार यांनी राष्ट्रवादीच्या अध्यक्षपदावरून निवृत्तीची घोषणा केल्यानंतर पुस्तक प्रकाशन सोहळ्याच्या कार्यक्रमात गोंधळ उडाला आहे. तर सर्व नेत्यांनी राजकारणातून निवृत्तीची घोषणा मागे घ्यावी अशी विनंती केली आहे. तर राष्ट्रवादीच्या नेत्यांनी आपल्या भावना यावेळी व्यक्त केल्या आहेत.

शरद पवारांच्या निर्णयाला सर्वांनी नकार दर्शवला असून तुमचा हा निर्णय आम्हाला नामंजूर आहे अशी घोषणा माजी मुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी केली आहे. त्याचबरोबर या निर्णयानंतर छगन भुजबळ, राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, जितेंद्र आव्हाड यांना अश्रू अनावर झाले होते. त्याचबरोबर सभागृहात उपस्थित असलेल्या कार्यकर्त्यांनासुद्धा अश्रू अनावर झाले होते.

साहेब तुम्ही ताबडतोब हा निर्णय मागे घ्या, कुणालाही कसलीच कल्पना न देता तुम्ही घेतलेला हा निर्णय आम्हाला मान्य नाही. राज्यभरातून सामान्य जनतेचे आज फोन येत आहेत. तुम्ही हा निर्णय मागे घ्यावा अशी आम्ही तुमच्याकडे भीक मागत आहोत अशा भावना सर्व नेत्यांनी व्यक्त केल्या असून अध्यक्षपदावरून निवृत्तीचा निर्णय मागे घेण्यासाठी विनंती केली आहे.

दरम्यान, शरद पवार यांचे आत्मचरित्र असलेले "लोक माझे सांगाती" या आत्मचरित्राच्या सुधारित आवृत्तीचा प्रकाशन सोहळा मुंबईत पार पडला. यावेळी भाषण करताना शरद पवार यांनी राष्ट्रवादीच्या अध्यक्षपदावरून निवृत्ती घेत असल्याची घोषणा केली आहे. त्याचबरोबर यापुढे निवडणूक लढवणार नसल्याचीही त्यांनी घोषणा केली. त्यांच्या या मोठ्या निर्णयानंतर चर्चा सुरू झाल्या आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Illegal Immigrants India : नक्षलवादानंतर आता घुसखोरांवर सर्जिकल स्ट्राईकची तयारी, अमित शहा यांनी बोलावली मोठी बैठक

Civic Works Halted: मतदार यादी पडताळणीमुळे पथ व भवन विभागाची कामे ठप्प; अभियंत्यांना मोहिमेतून मुक्त करण्याची जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी

Sourav Sonawane news: 'सोनवणेंना अटक करा', घुले कुटुंबीय थेट पाण्याच्या टाकीवर चढले

Shrikant Shinde चा ताफा अडवला, काळे झेंडे दाखवत शिवसैनिकांकडून जोरदार घोषणाबाजी

Kolhapur Crime: मुलगा की मुलगी? कोल्हापुरात गर्भलिंग निदानचा पर्दाफाश, चौघे ताब्यात; ३० हजार दर

SCROLL FOR NEXT