sharad pawar ajit pawar Sakal
महाराष्ट्र बातम्या

Sharad Pawar Resigns : अजित पवार दिल्लीला गेलेच नव्हते; पवारांनी केला सगळा खुलासा

संतोष कानडे

मुंबईः मागील काही दिवसांपासून अजित पवार हे भाजपसोबत जाणार असल्याच्या वावड्या उठल्या होत्या. त्यासंदर्भात आज शरद पवारांनी स्पष्टीकरण दिलं आहे.

शरद पवारांनी निवृत्तीचा निर्णय मागे घेतला आहे. राज्यभरातल्या कार्यकर्त्यांच्या भावना आणि देशभरातील नेत्यांशी झालेलं बोलणं, त्यानंतर आपण पक्षाचा अध्यक्ष राहण्याचा निर्णय घेतल्याचं शरद पवारांनी पत्रकार परिषदेत स्पष्ट केलं.

शरद पवारांना अजित पवारांबद्दल विचारण्यात आलं. ते म्हणाले की, अजित पवार दिल्लीला गेले होते, ही माहिती चूक आहे. राष्ट्रवादी कधीही भाजपबरोबर जाणार नाही. आमचे नेते भाजपबरोबर जाऊ इच्छितात, हे खोटं आहे. असं स्पष्टीकरण पवारांनी दिलं

शरद पवारांच्या राजीनाम्यावरुन मागील दोन दिवासंपासून वातावरण पेटलेलं आहे. पवारांनी घेतलेला राजीमाम्याचा निर्णय मागे घ्यावा, यासाठी कार्यकर्ते धरणं धरुन बसले होते. नवीन अध्यक्षांबाबत चर्चाही होत होती.

मात्र आज पवारांनी सर्वांच्या भावनांचा विचार करत अध्यक्षपदी कायम राहण्याचा निर्णय घेतला आहे. पुढे बोलतांना शरद पवार म्हणाले की, आमच्या निर्णयाचा महाविकास आघाडीवर काहीही परिणाम होणार नाही. शिवाय सुप्रिया सुळे अध्यक्ष होतील, यात काहीच तथ्य नाही. शेवटी आपणच अध्यक्ष राहणार असल्याचं स्पष्ट केलं आहे.

पत्रकार परिषदेला अजित पवार अनुपस्थित

मुंबईतील वाय बी सेंटर येथे झालेल्या पत्रकार परिषदेत आपण राजीनामा मागे घेत असल्याचे शरद पवार यांनी जाहीर केलं. मात्र यावेळी अजित पवार मात्र अनुपस्थित राहील्याचे दिसून आले. या पत्रकार परिषदेत अजित पवार उपस्थित राहीले नाहीत यावरून विचारलेल्या प्रश्नाल शरद पवारांनी उत्तर दिलं. ते म्हणाले की, सगळे पत्रकार परिषदला असतात का? असं म्हटलं आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

12 वर्षांच्या निष्ठेचा सन्मान! जातेगावचे कैलास उगले ठरले मानाचे वारकरी; आषाढी एकादशीला मुख्यमंत्र्यांसोबत शासकीय महापूजेचा मिळाला मान

Ashadhi Ekadashi : 'ज्ञानोबा माऊली'च्या गजरात CM देवेंद्र फडणवीस अन् अमृता फडणवीस यांनी धरला फुगडीचा फेर; पारंपरिक वेशात घेतला सहभाग

Ashadhi Ekadashi 2025 Live Updates : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस विठ्ठल मंदिरात दाखल, महापूजेला सुरुवात

MK Stalin Reaction : ठाकरे बंधूंच्या मेळाव्यावर आता CM स्टॅलिन यांचीही आली प्रतिक्रिया; केलंय मोठं विधान!

IND vs ENG 2nd Test: भारताची ऐतिहासिक विजयाच्या दिशेने कूच! Akash Deep चा भेदक मारा, इंग्लंडची उडवली झोप

SCROLL FOR NEXT