sharad pawar and sanjay raut Esakal
महाराष्ट्र बातम्या

Sanjay Raut : ''शरद पवारांमुळे आघाडीमध्ये संभ्रम निर्माण होत आहे, म्हणून...'' संजय राऊतांची भाषाच बदलली

संतोष कानडे

मुंबईः मुंबईमध्ये ३१ ऑगस्ट आणि १ सप्टेंबर रोजी होणाऱ्या बैठकीच्या अनुषंगाने आज नाना पटोले यांनी उद्धव ठाकरेंची भेट घेतली. या भेटीनंतर ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी शरद पवारांच्या बाबतीत थेटपणे एक विधान केलं आहे.

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी 'मातोश्री' निवासस्थानी जात उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे आणि संजय राऊत यांची भेट घेतली. या नेत्यांमध्ये मुंबईत होणाऱ्या इंडिया आघाडीच्या बैठकीबाबत चर्चा झाली. बैठकीनंतर पटोलेंनी माध्यमांशी संवाददेखील साधला.

त्यानंतर संजय राऊत यांनी माध्यमांशी बोलतांना शरद पवारांच्या बाबतीत निर्माण झालेला संभ्रम फार काळ राहता कामा नये, असं विधान केलं आहे. कायम शरद पवारांच्या जवळ असलेल्या संजय राऊतांची भाषा बदलल्याने आश्चर्य व्यक्त होतंय.

काय म्हणाले संजय राऊत?

शरद पवार आणि अजित पवार यांची पुण्यात भेट झाली, त्यामुळे संभ्रम निर्माण होतोय हे खरं आहे. असा संभ्रम वारंवार निर्माण होत आहे. परंतु हा संभ्रम फारकाळ राहता कामा नये. अशा भेटींमुळे आघाडीत चिंतेच वातावरण निर्माण होत आहे. आज नाना पटोले यांनी आमची भेट घेऊन इंडिया आघाडीच्या बैठकीसंदर्भात चर्चा केली. अशी प्रतिक्रिया संजय राऊतांनी दिली.

दरम्यान, ३१ ऑगस्ट आणि १ सप्टेंबर रोजी इंडिया आघाडीची मुंबईत बैठक होत आहे. या बैठकीसाठी शरद पवार, उद्धव ठाकरे, नाना पोटले हे आयोजक आहेत. कालच्या गुप्त भेटीबाबत आज शरद पवारांनी प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले की, अजित पवार हे माझे पुतणे आहेत. त्यामुळे त्यांनी माझी भेट घेतली तर वावगं काय? मात्र राज्याच्या राजकारणात या भेटीमुळे उलटसुलट चर्चा सुरु झालेल्या आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Army New Uniform: भारतीय लष्कराचा मोठा बदल! ८ वर्षांनंतर नवा ड्रेस कोड लागू; ब्रिटिशकालीन परंपरांना रामराम, आर्मीचा 'देसी' लूक चर्चेत

T20 World Cup: पाकिस्तानी खेळाडूंशी हँडशेक करणार का? भारताची कर्णधार हरमनप्रीत कौरने स्पष्टच दिलं उत्तर

Matheran Toy Train: माथेरानची राणी ४ महिने बंद, नवी सेवा सुरू होणार; मध्य रेल्वेचा मोठा निर्णय, कधीपासून आणि का?

Manoj Jarange Support : तुकाराम मुंढेंची बदली कराल तर... मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा

Latest Live Updates Marathi: गृह लक्ष्मी' आणि 'गृह ज्योती' यांसारख्या जनहितार्थ असलेल्या गॅरंटी योजना बंद केल्या जाणार नाहीत- शिवकुमार

SCROLL FOR NEXT