Disqualified MLA Supreme Court Assembly Speaker esakal
महाराष्ट्र बातम्या

Disqualified MLA : ..म्हणून विधानसभा अध्यक्ष 'सर्वोच्च' सुनावणीला विलंब लावून चालढकल करताहेत; NCP आमदाराचा गंभीर आरोप

आमदार अपात्र होणार हे कायद्याने निश्चित झाल्यानेच ते चालढकल करत होते, हे सिद्ध झाले आहे.

सकाळ डिजिटल टीम

‘‘मार्च, एप्रिलपर्यंत लोकसभा निवडणूक आहे; पण डिसेंबर, जानेवारीपर्यंत मुदतीच्या आत ही निवडणूक घेतली जाईल.’’

सातारा : आमदार अपात्रता प्रकरणात सरकार व अध्यक्ष सुनावणीला विलंब लावून चालढकल करत आहे. सर्वोच्च न्यायालयाने गांभीर्याने घेत विधानसभा अध्यक्षांना गर्भित सूचना केली असेल, तर हे आमदार अपात्र होणार हे लक्षात आल्यानेच ते चालढकल करत आहेत. त्यामुळे अध्यक्षांनी तातडीने निर्णय दिला नाही, तर सर्वोच्च न्यायालयाने निर्णय घेतला पाहिजे, असे आमदार शशिकांत शिंदे यांनी सांगितले.

जिल्हाधिकारी कार्यालयासमोर एका आंदोलनाला भेट दिल्यानंतर आमदार शिंदे (Shashikant Shinde) यांच्याशी पत्रकारांनी संवाद साधला. या वेळी आमदार अपात्रता (Disqualified MLA) प्रकरणावर त्यांनी भाष्य केले.

शिंदे म्हणाले, ‘‘आमदार अपात्रता प्रकरणात दिलेल्या मुदतीत अध्यक्षांनी (Assembly Speaker) निर्णय घ्यावा, असे सर्वोच्च न्यायालयाने (Supreme Court) सूचना दिली आहे; पण ती गांभीर्याने घेतली जात नाही. त्यामुळे सत्तेतील सरकार आणि अध्यक्ष सुनावणीला विलंब लावून चालढकल करत आहेत. ही बाब न्यायालयाने गांभीर्याने घेतल्यानंतर त्यांनी अध्यक्षांना गर्भित सूचना केली असेल.

आमदार अपात्र होणार हे कायद्याने निश्चित झाल्यानेच ते चालढकल करत होते, हे सिद्ध झाले आहे. न्यायालयाच्या इशाऱ्यानंतरही त्यांनी निर्णय दिला नाही, तर न्यायालयानेच निर्णय घेतला पाहिजे. लोकसभेच्या निवडणुकीपर्यंत ही सुनावणी लांबवली जाण्याची शक्यता आहे, असंही त्यांनी स्पष्ट केलं. लोकसभा निवडणुकीसंदर्भात शिंदे म्हणाले, ‘‘मार्च, एप्रिलपर्यंत लोकसभा निवडणूक आहे; पण डिसेंबर, जानेवारीपर्यंत मुदतीच्या आत ही निवडणूक घेतली जाईल.’’

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG: वैभव सूर्यवंशीला संधी नाहीच, स्टार खेळाडूचे कमबॅक; पहिल्या T20I साठी कशी आहे Playing XI?

Pune News: आई-वडिलांवरच अत्याचार! एकुलत्या एक मुलाविरोधात ५८ वर्षीय मातेचा लढा; न्यायालयाचे कडक आदेश..

WhatsApp चं Username फीचर वादाच्या भोवऱ्यात, केंद्र सरकारने थेट Meta ला पाठवली नोटीस, तीन दिवसांत उत्तर देण्याचे निर्देश

Raigad Accident: पालीत मोठा अनर्थ टळला! खड्ड्यांमुळे एसटी बस रस्त्याखाली घसरली; चालकाच्या प्रसंगावधानाने ४२ प्रवाशांचे प्राण वाचले

Satara Heritage: साताऱ्याच्या ऐतिहासिक वैभवाला नवी झळाळी! संगम माहुली विकासासाठी १३२.९५ कोटींना मंजुरी, काय आहे ऐतिहासिक महत्त्व..

SCROLL FOR NEXT