esakal
esakal
महाराष्ट्र

संजय राऊतांच्या पेटी वाजवण्याबद्दल शर्लिन म्हणते...

धनश्री ओतारी

महाराष्ट्र राज्यातील राजकीय घडामोडींनी वेग आला आहे. एकीकडे शिंदे (Eknath Shinde) गटाकडून बंड पुकारण्यात आलं आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात चांगलीच खळबळ माजली आहे. आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झडत आहेत. अशातच, बॉलीवूडच्या एका अभिनेत्रीने सुरु असलेल्या घडामोडीत उडी घेतली आहे. ट्विट करत तिने खासदार संजय राऊत यांच्यावर निशाणा साधला(sherlyn chopra on sanjay raut and maharashtra politics) आहे.

मॉडेल आणि अभिनेत्री शर्लिन चोप्राने आपल्या ट्विटर अकाऊंटवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. ज्यामध्ये संजय राऊत सुर पेटी वाजवताना दिसत आहे. 'अच्छा सिला दिया तूने मेरे प्यार का, अच्छा सिला दिया तूने मेरे प्यार का, यार ने ही लुट लिया घर यार का'' या गाण्याच्या धुनची जोड दिली आहे.

शर्लिनने हा व्हिडीओ शेअर करत 'हमें नहीं मालूम था कि सर इतना अच्छा बजाते हैं " असे कॅप्शनमध्ये म्हटले आहे. शर्लिनचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

गेल्या काही दिवसांपासून, महाराष्ट्र राज्यात राजकीय उलथापाळथ सुरू आहे. शिवसेनेच्या एकनाथ शिंदे यांच्यासह ३५ पेक्षा अधिक आमदारांनी बंड पुकारला आहे. या सर्व आमदारांनी संजय राऊतांवर निशाणा साधला आहे. अनेक आमदारांनी संजय राऊत वागणुक नीट देत नसल्याचे आरोप केले आहेत.

दरम्यान, एकनाथ शिंदे (Eknath Shinde)यांचा गट आज राज्यपालांना (Bhagat Singh Koshyari) पत्र देणार असल्याची माहिती समोर आली आहे. शिंदे गट हीच शिवसेना (Shivsena) असल्याचा दावा राज्यपालांकडे देणाऱ्या पत्रात केला असल्याची सूत्रांची माहिती आहे.

तर दुसरीकडे पक्षाच्या नेते पदावरुन शिंदे यांची हकालपट्टी होण्याची शक्यता आहे. शिवसेनेच्या राष्ट्रीय कार्यकारिणीची आज बैठक बोलावण्यात आली आहे. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे शिंदे यांच्यासंदर्भात निर्णय घेणार आहेत. आज दुपारी १ वाजता शिवसेना भवनात राष्ट्रीय कार्यकरिणी बैठक आहे. पक्षाच्या घटनेतही काही बदल केले जाण्याची शक्यता आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Accident : दोघांचा जीव घेणाऱ्याला 'अशी' शिक्षा; वाहतूक जागृतीचे फलक रंगवायचे, तीनशे शब्दांचा निबंध लिहायचा अन्...

IPL 2024 RR vs KKR: कोलकाता-राजस्थान सामन्यावर फिरलं पावसाचं पाणी, सामना करावा लागला रद्द

Pune: नुकतीच 12 वी झालेली, पार्टीसाठी बिल्डर वडिलांची आलिशान गाडी घेतली अन्...; आरोपी तरुणाचा प्रताप समोर

SRH vs PBKS: पंजाबचा शेवटच्या मॅचसाठी ऐतिहासिक निर्णय! आजपर्यंत कोणत्याच संघानं न केलेली गोष्ट करत रचला इतिहास

काय सांगता! एकाच व्यक्तीने केलं 8 वेळा मतदान; व्हिडिओ शेअर करत विरोधकांनी केलाय दावा

SCROLL FOR NEXT