Maharashtra Politics Esakal
महाराष्ट्र बातम्या

Maharashtra Politics: शिंदे-फडणवीस सरकार अनैतिक, भाजपच्या बड्या नेत्याचं वक्तव्य

आजपर्यंत फक्त विरोधक सत्ताधारी शिंदे फडणवीस सरकारवर अनैतिक असल्याचा आरोप करत होते

सकाळ डिजिटल टीम

आजपर्यंत फक्त विरोधक सत्ताधारी शिंदे फडणवीस सरकारवर हे सरकार अनैतिक असल्याचा आरोप करत होते, पण यावेळी भाजपचे माजी खासदार सुब्रमण्यम स्वामी यांनी या सरकारवर हल्लाबोल केला आहे. पक्ष तोड-फोड करून हे सरकार सत्तेत आलं आहे, त्याचबरोबर हे सरकार अनैतिक आहे. इतर पक्षांना तोडून हे सरकार बनवलं आहे असं वक्तव्य सुब्रमण्यम स्वामी यांनी केलं आहे.

भाजपचे माजी खासदार सुब्रमण्यम स्वामी आज पंढरपूर दौऱ्यावर आले होते. पंढरपूर कॉरिडोअरविरोधात त्यांनी राज्य शासनाच्या विरोधात भूमिका घेतली आहे. फडणवीस यांनी हा कॉरिडोअर कोणत्याही परिस्थितीत उभा राहिलं अशी ठाम भूमिका मांडली होती. त्या विरोधात सुब्रमण्यम स्वामी यांनी आपली भूमिका घेत देवेंद्र फडणवीस यांना इशारा देत पंढरपूरचा विकास करण्याचा सल्लाही त्यांनी यावेळी दिला आहे.

पंढरपूरमध्ये माध्यमांशी बोलताना सुब्रमण्यम स्वामी यांनी सरकारच्या कृतीवर आणि शिंदे फडणवीस सरकार संदर्भात बोलताना ते म्हणाले की, ‘हे सरकार पक्ष इतर तोडून आणि आमदार फोडून हे सरकार बनवलं आहे. चालू सरकार फोडून नवीन सरकार बनवण्याची काहीच गरज नव्हती. विरोधात बसून आघाडीची पोलखोल करायची होती. त्यामुळं हे सरकार अनैतिक आहे असं वक्तव्य सुब्रमण्यम स्वामी यांनी केलं आहे.

विरोधक दरवेळी शिंदे फडणवीस सरकारवर टीका करते. परंतु यावेली सत्तेतील भाजपच्या माजी खासदाराने या सरकारला अनैतिक संबोधल्यामुळे इतर पक्षांच्या नेत्यांच्या भुवया उंचावल्या आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG, 2nd T20I: रवी बिश्नोईची 'ती' चूक महागात पडली! जेकब बेथलच्या आक्रमणामुळे भारताविरुद्ध इंग्लंडचा ऐतिहासिक विजय

IND vs ENG, 2nd T20I: अक्षर पटेलने इंग्लंडच्या कॅप्टनला आऊट करत घडवला इतिहास; यापूर्वी कोणत्याही भारतीय फिरकीपटूला जमलं नव्हतं!

जळगावमध्ये भीषण अपघात! टोलनाक्यावर उभ्या ट्रकला गॅस टँकरची धडक, बघता क्षणी घेतला पेट, आगीत होरपळून दोघांचा मृत्यू

Latest Marathi Update : राज्यासह देशविदेशात दिवसभरात काय काय घडलं? वाचा एका क्लिकवर...

Raigad Heavy Rain : रायगडला मुसळधार पावसाचा तडाखा; अंबा नदी धोक्यापलीकडे, भेरव पूल पाण्याखाली, पोलादपुरात दरड कोसळल्याने नागरिकांचे स्थलांतर

SCROLL FOR NEXT