महाराष्ट्र

शिवसेना भाजपच्या युतीची घोषणा लवकरच : मुनगंटीवार

वृत्तसंस्था

मुंबई : शिवसेना आणि भाजपमध्ये लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बैठकांवर बैठका सुरू आहेत. युतीबाबत शिवसेनेकडून सावध पवित्रा घेतला जात असतानाच, युतीची घोषणा लवकरच होणार असल्याचे भाजप नेते आणि अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी आज भाजप प्रदेश कार्यलयात सांगितले. 

मुनगंटीवार आणि महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत "मन की बात, मोदी के साथ', या उपक्रमांतर्गत रथ यात्रेचा प्रारंभ करण्यात आला. या वेळी मुनगंटीवार यांनी पत्रकारांशी संवाद साधला. 

"मातोश्री' निवासस्थानी आज शिवसेनेच्या वरिष्ठ नेत्यांची तसेच आमदार आणि खासदारांची बैठक झाली. या बैठकीत आगामी निवडणूक आणि युतीबाबत ही चर्चा झाली; मात्र या बैठकीचा तपशील शिवसेनेचे प्रवक्ते आणि खासदार संजय राऊत यांनी उघड केला नाही. शिवसेना स्वबळावर लढण्यास सक्षम असून, याबाबतचा निर्णय पक्षप्रमुख उद्धव ठाकरे घेतील, असे सांगितले.

यादरम्यान, अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी, लवकरच युतीची घोषणा होईल'', असे वक्तव्य केले. प्रशांत किशोर हे एनडीएचे घटक आहेत. त्यांनी शिवसेनेला मदत केली तरी ती आम्हालाच मदत ठरणार आहे, असेही मुनगंटीवार म्हणाले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024, RCB vs CSK: चेन्नईचा 17 व्या हंगामातील प्रवास थांबला! धोनीचीही कारकिर्द संपली? सामन्यानंतरचा पाहा Video

Loksabha Election 2024 : हुश्श..! प्रचार संपला, राज्यात तोफा शांत, तलवारी म्यान

IPL 2024: RCB चा आनंद गगनात मावेना! प्लेऑफमध्ये पोहचताच केला जोरदार जल्लोष, पाहा Video

‘चार सौ पार’ पासून बहुमताच्या आकड्यापर्यंत

सत्ता ठरवणारा उ त्त र रं ग

SCROLL FOR NEXT