Shambhuraj Desai Shiv Sena esakal
महाराष्ट्र बातम्या

Shiv Sena : 'धनुष्यबाण' चिन्ह नाही मिळालं तर सर्व बाजूनं आमची तयारी - शंभूराज देसाई

'धनुष्यबाण चिन्हं आम्हालाच मिळेल. बहुमतातील शिवसेना आमच्याकडं आहे.'

सकाळ डिजिटल टीम

'धनुष्यबाण चिन्हं आम्हालाच मिळेल. बहुमतातील शिवसेना आमच्याकडं आहे.'

सातारा : महाराष्ट्रातील सत्तासंघर्षावर घटनापीठापुढं पुढील सुनावणी येत्या 27 सप्टेंबरला होणार आहे. तोपर्यंत शिवसेनेचे (Shiv Sena) निवडणूक चिन्ह धनुष्यबाण कोणत्या गटाला द्यावे, याबाबत निवडणूक आयोगानं (Election Commission) निर्णय घेऊ नये, असे निर्देश सर्वोच्च न्यायालयानं (Supreme Court) दिले. 23 ऑगस्टपासून प्रलंबित असलेली सुनावणी बुधवारी घटनापीठापुढं झाली. या घटनापीठात न्या. धनंजय चंद्रचूड, न्या. एम. आर. शहा, न्या. कृष्ण मुरारी, न्या. हिमा कोहली व न्या. पी. एस. नरसिंहा यांचा समावेश आहे.

याच पार्श्वभूमीवर शंभूराज देसाई (Shambhuraj Desai) यांनी धनुष्यबाण आमचाच आहे, असा दावा केलाय. बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray) ही केवळ एक व्यक्ती नव्हे तर विचार आहेत. आम्ही त्यांच्या विचारांचे वारसदार आहोत. ठाकरे परिवार संपत्ती आणि कुटुंबाचे वासदार जरूर असतील. पण, आम्ही वैचारिक वारसादार आहोत. चिन्हं रुजवायला वेळ जाईल. पण, आमची शिवसेना शाखांपर्यंत जाईल, असंही देसाई म्हणालेत.

'चिन्हं नाही मिळालं तर सर्व बाजूनं आमची तयारी'

धनुष्यबाण (Bow and Arrow) चिन्हं आम्हालाच मिळेल. बहुमतातील शिवसेना आमच्याकडं आहे. आमदार-खासदार, नगरसेवक, सरपंचाचं बहुमत आमच्याकडं आहे. लोकांमधून आलेले लोकप्रतिनिधींचं बहुमत आमच्याकडं आहे. त्यामुळं आम्हालाच चिन्हं मिळेल, अशी कोर्टाकडून आशा आहे. चिन्हं नाही मिळालं तर सर्व बाजूनं आमची तयारी आहे. ज्वलंत हिंदुत्व कुणाकडे आहे हे लोकांना माहीत आहे. आमचं हजारो लोकांनी स्वागत केलं. लोकं आमच्या स्वागताला आजही येत असतात. आमचा निर्णय योग्य असल्याचं सांगत आहेत, असं म्हणत धनुष्यबाण आमचाच असल्याचं देसाईंनी ठणकावून सांगितलंय.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Fishing Ban: महाराष्ट्रात मासेमारी बंदीचा कालावधी वाढला! सरकारचा मोठा निर्णय; आता किती दिवस बंदी राहणार? जाणून घ्या...

Solapur Crime: सोलापुरात धक्कादायक प्रकार! डॉ. वळसंगकरांचे जावई सुजय फडकेविरुद्ध ‘पोक्सो’, पोलिसांत गुन्हा; अल्पवयीन मुलीचा विनयभंग अन्‌ छळाचा आरोप

PMOS वर घरगुती उपाय शोधताय? अभिनेत्री भाग्यश्रीने शेअर केली 'या' पाण्याची हेल्थ टिप, नक्की ट्राय करा

Gadhphara Treasure: या किल्ल्यात रात्री खजिना शोधायला येतात पर्यटक! JCB चालकाला सापडलेल्या सोन्याच्या ४ घागरी, काय आहे रहस्य?

Latest Marathi News Live Update : मुसळधार पावसाचा कहर, सायन-पनवेल हायवे जलमय

SCROLL FOR NEXT