महाराष्ट्र बातम्या

सेनेचे बंडखोर आमदार म्हणाले, आमची नाराजी नेतृत्वावर नाही तर...

बंड पुकारलेल्या कोणत्याही शिवसेना आमदारांची भूमिका काय हे समोर आले नव्हते, मात्र आता...

सकाळ डिजिटल टीम

बंड पुकारलेल्या कोणत्याही शिवसेना आमदारांची भूमिका काय हे समोर आले नव्हते, मात्र आता...

विधान परिषदेचा निकाल जाहीर झाल्यापासून महाराष्ट्रातील राजकारणात अनेक राजकीय नाट्यमय घडोमोडी घडल्या आहेत. कालपासून राज्यात अनेक राजकीय भूकंप पहायला मिळाले आहेत. दरम्यान, काल रात्री एकनाथ शिंदे यांनी पहिल्यांदाचा समोर येऊन माध्यमांना प्रतिक्रिया दिली. परंतु बंड पुकारलेल्या कोणत्याही शिवसेना आमदारांची भूमिका काय हे समोर आले नव्हती. मात्र आता औरंगाबाद पश्चिमचे शिवसेना आमदार संजय शिरसाट यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

आमची नेतृत्वावर नाराजी नसून आमची राष्ट्रवादी-काँग्रेसवर नाराजी असल्याच शिरसाट यांनी सांगितलं आहे. ते म्हणाले की, आम्ही सोबत असून, सर्वजण गुवाहाटीत आलो आहोत. आमची बैठक झाल्यावर एकनाथ शिंदे योग्य तो निर्णय घेतील. सद्या आम्ही शिवसनेचे 35 आणि अपक्ष 5 असे चाळीस आमदार सोबत आहोत. दुपारपर्यंत हा आकडा 46 च्या पुढे जाईल, असंही शिरसाट म्हणाले आहेत.

पुढे ते म्हणाले, आमची राष्ट्रवादी आणि काँग्रेसवर नाराजी असून नेतृत्वावर नारजी नाही. आता भाजपसोबत जायचं की आणखी काही याचा निर्णय एकनाथ शिंदे घेतील असेही शिरसाट म्हणाले. यावेळी आमदारांना मारहाण झाली का? या प्रश्वावर त्यांनी सांगितले की, आम्ही सर्व आमदार आहोत त्यांना कशी मारहाण केली जाऊ शकते. लोकप्रतिनिधी आहे त्यामुळे त्यांना कोण का मारहाण करेल. संजय राऊत काय बोलतात त्यांना माहित असून, त्यांना कुठून माहिती मिळते काय माहित असेही शिरसाट म्हणाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Fishing Ban: महाराष्ट्रात मासेमारी बंदीचा कालावधी वाढला! सरकारचा मोठा निर्णय; आता किती दिवस बंदी राहणार? जाणून घ्या...

Solapur Crime: सोलापुरात धक्कादायक प्रकार! डॉ. वळसंगकरांचे जावई सुजय फडकेविरुद्ध ‘पोक्सो’, पोलिसांत गुन्हा; अल्पवयीन मुलीचा विनयभंग अन्‌ छळाचा आरोप

PMOS वर घरगुती उपाय शोधताय? अभिनेत्री भाग्यश्रीने शेअर केली 'या' पाण्याची हेल्थ टिप, नक्की ट्राय करा

Gadhphara Treasure: या किल्ल्यात रात्री खजिना शोधायला येतात पर्यटक! JCB चालकाला सापडलेल्या सोन्याच्या ४ घागरी, काय आहे रहस्य?

Latest Marathi News Live Update : मुसळधार पावसाचा कहर, सायन-पनवेल हायवे जलमय

SCROLL FOR NEXT