Sanjay Raut
Sanjay Raut 
महाराष्ट्र

'बेटी भगाओ'ची भाजपची नवी घोषणा : संजय राऊत

वृत्तसंस्था

मुंबई : बेटी बचाओ, बेटी पढाओनंतर आता भाजप नेते बेटी भगाओ अशी घोषणा देत आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस त्या व्यासपीठावर गेले होते, त्यामुळे त्यांनी या प्रकरणी स्पष्टीकरण द्यावे, असे शिवसेना नेते संजय राऊत यांनी म्हटले आहे.

सोमवारी घाटकोपर येथे दहीहंडीमध्ये राम कदम यांनी मुक्ताफळं उधळल्यानंतर त्यांच्यावर चौफेर टीका होऊ लागली आहे. कदम म्हणाले, तुम्ही कोणत्याही कामासाठी भेटू शकता. साहेब, साहेब मी तिला प्रपोज केले, पण ती मला नाही म्हणते, प्लिज मदत करा. शंभर टक्के मदत करणार. आधी मी सांगेन की, तुम्ही तुमच्या आईवडिलांना घेऊन या. आई-वडील म्हणाले, की ही मुलगी मला पसंत आहे, तर तिला पळवून आणणार आणि तुम्हाला देणार. त्या मुलीला पळवून आणण्यास मी मदत करेन. त्यासाठी माझा फोन नंबर घ्या आणि संपर्क साधा, असे त्यांनी म्हटले होते. यावरून राज्यभर वादंग उठले असून, राम कदम यांच्यावर जोरदार टीका होत आहे.

संजय राऊत म्हणाले, की मुलींबद्दल भाजप आमदारांकडून असे वक्तव्य होत असेल तर त्यांनी निर्भयाबद्दल गाळलेले अश्रू खोटे होते. मुख्यमंत्र्यांनी महिलांबद्दल असे बेताल वक्तव्य राम कदमांवर कारवाई करावी. मराठी कलाकार व मुख्यमंत्री त्या मंचावर जाऊन आले आणि राम कदम असे महिलांबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य करत आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sharad Pawar: "अरे मामा जरा जपून... तुझं सर्व काढायला वेळ लागणार नाही"; इंदापुरात शरद पवारांचा इशारा!

Shreyas Talpade: कोरोना लसीमुळे हृदयविकाराचा झटका आला? श्रेयस तळपदे म्हणाला,'लस घेतल्यानंतर मला...'

IPL 2024 PBKS vs CSK Live Score : चाहरनं सीएसकेला पाडलं खिंडार, ऋतुराज पाठोपाठ दुबेलाही केलं बाद

Lok Sabha : 'एक भाकरी, एक रूपया द्या.. एका भिक्षुकाला पंतप्रधान करा' म्हणणाऱ्या विजयप्रकाश कोंडेकरांकडे किती आहे संपत्ती?

Latest Marathi News Live Update : राहुल गांधी यांनी वायनाडच्या लोकांशी केलेली फसवणूक - गौरव वल्लभ

SCROLL FOR NEXT