महाराष्ट्र बातम्या

कोल्हेंवर आढळरावांचा पलटवार; "नाटकातली घोडी अनं नौटंकी थाट!"

खासदार अमोल कोल्हे माझं आव्हान पुर्ण करूच शकत नाहीत असं आढळराव म्हणाले.

सुधीर काकडे

राष्ट्रवादीचे खासदार अमोल कोल्हे त्यांच्या वक्तव्यांसाठी आणि अभिनयासाठी चर्चेत असतात. पण आज त्यांनी पुण्याच्या (Pune) निमगाव दावडीत बैलगाडा घाटात घोड्यावर मांड ठोकली. (Amol Kolhe on Horse) २०१९ च्या निवडणुकीत कोल्हे यांनी भर सभेत निवडून आल्यानंतर घाटात बैलगाडा शर्यतीत घोडी पळवणार असल्याचं सांगितलं होतं. यावरून त्यांचे विरोधक आणि सेनेचे माजी खासदार शिवाजी आढळराव पाटील (Shivaji Adhalrao Patil) यांनी दिलेलं चॅलेंज पूर्ण केलं असं म्हटलं जातंय. मात्र आता माजी खासदार आढळराव पाटील यांनी हा दावा खोडून काढला आहे.

अमोल कोल्हे घोडीवर बसले मात्र ती घोडी नाटकातली घोडी होती असं आढळराव म्हणाले. अमोर कोल्हेंनी लोकांना शब्द दिला होता, की बैलगाडा शर्यत सुरू होईल तेव्हा मी घोडीवर बसेल. मात्र बैलगाडा शर्यत १६ डिसेंबर २०२१ ला बंदी उठली. ११ जानेवारीला शर्यती सुरू झाल्या. त्यावेळी आपण आव्हान केलं होतं. त्यावेळी मी आव्हान केलं होतं की, शब्द पुर्ण करायचा असेल तर त्यांनी लांडेवाडी किंवा नानवलीच्या यात्रेला यावं अन् घोडीवर बसावं. मात्र ते ११ नंतर थेट १६ ला आले आणि पहिल्या नाही, तर जत्रा सुरू झाल्यावर आले असं आढळराव म्हणाले.

बसले तर बसले पण ते घोडीवर बसल्यामुळे, घोडी मागे होती अन् बैल पुढे पळत होते. बैलगाडा तज्ञ आणि शेतकऱ्यांना हे माहितीये की, ती घोडी नाटक, तमाशा अन् चित्रपटात वापरली जाणारी घोडी होती. ती शेतकऱ्यांची घोडी नव्हती असं आढळराव म्हणाले. जसं नाटकात ते लोकाना बनवाबनवी करण्याचं काम ते करत आहेत असा आरोप आढळरावांनी केला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Prithvi Shaw: ठरलं! मुंबई सोडलेल्या पृथ्वी शॉला मिळाला नवा संघ, आता ऋतुराज गायकवाडच्या नेतृत्वात खेळणार

Latest Maharashtra News Updates : एरंडोल तालुक्यात सलग दुसऱ्या दिवशी समाधानकारक पाऊस

Video: धक्कादायक! रिलसाठी अल्पवयीन मुलाने ट्रेन ट्रॅकवर जीव धोक्यात टाकला, व्हायरल व्हिडिओ

सुलतानला नऊ वर्षं पूर्ण ! सलमानने सिनेमासाठी स्वतःमध्ये घडवलेले हे पाच बदल

Tahawwur Rana : 26/11 दहशतवादी हल्ला प्रकरणी महत्त्वाची अपडेट; तहव्वूर राणानं दिली हल्ल्याची कबुली, नेमकं काय केला खुलासा?

SCROLL FOR NEXT