Uddhav Thackeray  Sakal
महाराष्ट्र बातम्या

Shivsena : चर्चा तर होणारच! सेनेचा दसरा मेळावा अडचणीत; हे पर्याय अवलंबणार?

आगामी दसरा मेळाव्यावरून शिंदे गट आणि शिवसेनेमध्ये वाद सुरू आहे.

सकाळ डिजिटल टीम

Shivaji Parak Melava Controversy : आगामी दसरा मेळाव्यावरून शिंदे गट आणि शिवसेनेमध्ये वाद सुरू असून, शिवाजी पार्क मौदानावर दसरा मेळाव्याला बीएमसीने दोन्ही गटांना परवानगी नाकारली आहे. तर, दुसरीकडे शिंदे गटाने मेळाव्यासाठी बीकेसी मैदान बुक केलं आहे. तर, दुसरीकडे शिवाजी पार्कसाठी दोन्ही गटांकडून हायकोर्टात याचिका दाखल करण्यात आल्या आहेत. या सर्व घडामोडींमध्ये यंदाच्या वर्षी शिवसेनेची दसरा मेळाव्याची परंपरा खंडित होणार का? असा प्रश्न उपस्थित झाला आहे.

दरम्यान, मुंबई महापालिकेने शिवाजी पार्कवर शिवसेनेला परवानगी न दिल्याने आणि शिंदे गटाकडून बीकेसी आधीच बुक झाल्याने दसरा मेळावा घ्यायाचा तरी कुठे असा पेच निर्माण झाला आहे. जर, हायकोर्टानेदेखील शिवसेनेची शिवाजी पार्कवर मेळावा घेण्यास परवानगी नाकारल्यास शिवसेना या चारपर्यायांपैकी एकाची निवड करू शकते असे सांगितले जात आहे.

चार पर्याय कोणते?

हायकोर्टाने जर शिवसेनेला परवानगी नाकारली तर, आगामी दसरा मेळावा शिवसेना ऑनलाईन मेळावा घेण्याची शक्यता वर्तवली जात आहे. याशिवाय ठाकरेंसमोर गोरेगावच्या नेस्को संकुलाचा एक पर्याय आहे. तसेच तिसरा पर्याय म्हणजे महालक्ष्मी येथील रेसकोर्स मैदान एक पर्याय आहे. तर चौथा पर्याय आझाद मैदान हा पर्यायदेखील असल्याचे सांगितले जात आहे. मात्र, हे सर्व पर्याय कोर्टाचा निर्णय काय येतो यानंतर शिवसेना अवलंबू शकते असे सांगितले जात आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

US-Iran Tension: तणाव पुन्हा वाढला! कराराची घाई नाही; इराणने अटी मानल्या नाहीत तर हल्ला करू, डोनाल्ड ट्रम्प यांची थेट धमकी

IPL New Rule: इम्पॅक्ट प्लेअर नियम काढून टाका... सचिन तेंडुलकरने सुचवले ३ नवीन बदल; ट्वेंटी-२०ची गुणवत्ता टिकवायची असेल तर...

IPL 2026 Final, RCB vs GT live: बंगळुरू - गुजरात संघात महामुकाबला! BCCI निवड समिती प्रमुखांसह डिविलियर्सही अहमदाबादमध्ये दाखल

IPL 2026: ५ पैकी ५... RCB कडे आहे असा खेळाडू जो देतो चॅम्पियन बनण्याची गॅरंटी! आजपर्यंत कधी हरला नाही T20 फायनल

NIA Deputy SP Accident: भरधाव दुचाकीची कंटेनरला धडक; राष्ट्रीय तपास संस्थेच्या उपअधीक्षकांचा दुर्दैवी मृत्यू; प्रेयसी गंभीर जखमी

SCROLL FOR NEXT