Jitendra Maharaj Narendra Modi esakal
महाराष्ट्र बातम्या

देशात पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वाखाली लवकरच 'रामराज्य' येईल; जितेंद्र सरस्वती महाराजांचं मोठं वक्तव्य

आजही देशात अफजलखान प्रवृत्तीचे अनेक गद्दार वावरत आहेत.

भद्रेश भाटे

त्या गद्दारांना धडा शिकवण्‍यासाठी, हिंदू धर्म रक्षणासाठी सर्वांनी जात-पात, पक्ष, संघटना बाजूला ठेऊन एकत्र यावे,’’ असे आवाहनही त्यांनी केले.

वाई : देशातील जिहादी, आतंकवादी व दहशतवादी प्रवृत्तीचे समूळ उच्चाटन करण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराज यांचे चरित्र डोळ्यासमोर ठेऊन त्यांचे विचार आचरणात आणावेत, असे आवाहन नाशिक येथील हिंदू आश्रमाचे पिठाधीश्वर जितेंद्र सरस्वती महाराज (Jitendra Saraswati Maharaj) यांनी केले.

येथील महागणपती घाटावर (सर सेनापती हंबीरराव मोहितेनगर) शिवप्रताप दिनानिमित्त (ShivPratap Din) प्रतापगड उत्सव समितीतर्फे आयोजित कार्यक्रमात प्रमुख वक्ते म्हणून ते बोलत होते. याप्रसंगी समितीतर्फे बाळकृष्ण ऊर्फ अप्पा परब (मुंबई) यांना ‘वीर जिवा महाले’ तर ॲड. राजीव देशपांडे (पुणे) यांना ‘पंताजीकाका बोकील अभिवक्ता’ पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.

यावेळी समितीच्या निमंत्रक विजयाताई भोसले, उपाध्यक्ष विनायक सणस, पंडितराव मोडक, अजय पावसकर, अनिकेत जवळकर, ॲड. नाझिया इलाहिखान, शारदाताई जाधव, कर्नसिंह मोहिते, नितीन भिलारे यांची प्रमुख उपस्थिती होती.

ShivPratap Din Wai

जितेंद्र सरस्वती म्हणाले, ‘‘पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली देशात लवकरच रामराज्य येईल. त्याची सुरुवात अयोध्येतील राम मंदिर उभारणीने होत आहे. आजही देशात अफजलखान प्रवृत्तीचे अनेक गद्दार वावरत आहेत. त्यांना धडा शिकवण्‍यासाठी, हिंदू धर्म रक्षणासाठी सर्वांनी जात-पात, पक्ष, संघटना बाजूला ठेऊन एकत्र यावे,’’ असे आवाहन त्यांनी केले.

यावेळी ॲड. नाझिया इलाहिखान यांनी मनोगत व्यक्त केले. सनातन धर्माच्या घर वापसी अभियानांतर्गत अंतर्गत हिंदू धर्मात प्रवेश केलेल्या मुलींनी आपल्या अनुभवाचे कथन केले. यावेळी शाहीर यशवंत जाधव (छत्रपती संभाजीनगर) व त्यांच्या सहकाऱ्यांनी प्रतापगडचा रणसंग्राम हा पोवाडा सादर केला. किल्ला स्पर्धा विजेत्यांना बक्षिसे देण्यात आली. समितीचे अध्यक्ष गणेश जाधव, पंकज शिंदे, प्रथमेश ढोणे, योगेश चंद्रस, स्वप्नील भिलारे, हिंदवी भाटे आदींनी स्वागत केले. मंदार खरे यांनी पुरस्कारकर्त्यांचा परिचय करून दिला. गणेश निगडे यांनी मानपत्र वाचन केले. आनंद पटवर्धन यांनी सूत्रसंचालन केले.

छत्रपती शिवाजी महाराजांनी जगावे कसे, संभाजी महाराजांनी मरावे कसे, तर राणी ताराबाईने लढावे कसे? याची शिकवण दिली. शिवाजी महाराजांच्या चरित्रातून अन्यायाच्या विरोधात लढण्याची प्रेरणा मिळते. आपला देश, धर्म व संस्कृती जिवंत ठेवण्यासाठी प्रत्येकाने लढण्याची ताकद ठेवली पाहिजे.

-अप्पा परब, (वीर जिवा महाले, पुरस्‍कार विजेते)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

मोठी बातमी! बिहारमध्ये NDA मंत्रिमंडळाचा फॉर्म्युला ठरला? कोणत्या पक्षातून किती मंत्री होणार? 'या' दिवशी शपथविधी सोहळ्याची शक्यता

Asia Cup, IND A vs PAK A: वैभव सूर्यवंशी, नमन धीर पाकिस्तानविरुद्ध बरसले! भारताने विजयासाठी ठेवलं 'इतक्या' धावांचं लक्ष्य

Viral Video: 91व्या वर्षीही करतात 12 तास ड्यूटी! फिट राहण्याचं सिक्रेट विचारताच आजोबांनी दिलं असं काही उत्तर...नेटकरीही झाले थक्क

Solapur Political : मंगळवेढ्यात काँग्रेसचा पंढरपूरप्रमाणे आघाडीसोबत लढण्याचा पॅटर्न!

मेडिक्लेम पॉलिसी घेताना अर्ज व्यवस्थित भरून देणे गरजेचे; अपुऱ्या अर्जामुळे...

SCROLL FOR NEXT