Sharad Pawar on shivraj rakshe esakal
महाराष्ट्र बातम्या

Sharad Pawar : पुणेकर शिवराज राक्षेच्या विजयानंतर शरद पवारांचं ट्विट चर्चेत

सकाळ डिजिटल टीम

पुणेः यंदाचा महाराष्ट्र केसरी किताब पैलवाल शिवराज राक्षे याने पटकावला आहे. पुण्यातील मामासाहेब मोहोळ क्रीडानगरीमध्ये आज ६५ वी राज्य अजिंक्यपद व महाराष्ट्र केसरी स्पर्धा पार पडली. अत्यंत चालाखीने शिवराजने महिंद्रला चितपट केलं.

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी ट्विट करुन शिवराज राक्षेचं कौतुक केलं आहे. ''पुणे जिल्ह्यातील पैलवान शिवराज राक्षे याने अतिशय थरारक लढतीत चीतपट कुस्ती करून यंदाचा महाराष्ट्र केसरी किताब पटकवला . सामान्य शेतकरी कुटूंबातून आलेल्या शिवराजचे मनपूर्वक अभिनंदन!'' अशा शब्दांत पवारांनी शिवराजचं कौतुक केलं.

कुस्ती जिंकल्यानंतर शिवराजने माध्यमांना प्रतिक्रिया दिली. तो म्हणाला, आज खूप आनंद होतोय. आई-वडील येथे आलेले नाहीत परंतु त्यांनाही खूप आनंद झाला असेल. वस्ताद काका पवार यांच्यामुळेच हे शक्य झालं. माझं पुढचं लक्ष्य हे ऑलिम्पिक आहे. आजचा आनंद शब्दांमध्ये व्यक्त करु शकत नाही. असं म्हणून त्याने सहकार्य करणाऱ्या सर्वांचे आभार मानले.

महाराष्ट्र केसरीसाठी महेंद्र गायकवाड विरूद्ध शिवराज राक्षे यांच्यामध्ये लढत झाली. दरम्यान, या लढतीत शिवराज राक्षेने महेंद्र गायकवाडला अवघ्या दोन मिनिटात चितपट करत महाराष्ट्र केसरीच्या किताबावर आपलं नाव कोरलं.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

पक्षात खदखद! नेतृत्वावर थेट प्रश्न अन्...; राष्ट्रवादीच्या बड्या नेत्याची भावनिक पोस्ट चर्चेत, काय म्हणाले?

जमीन, जागेची खरेदी-विक्री आता कोणत्याही तालुक्यात! खरेदी-विक्री व्यवहारातून राज्याच्या तिजोरीत ५८,६७३ कोटी; ३१ मार्चपर्यंत सुट्टीतही सुरु राहणार कार्यालये

सोने-चांदीच्या भावात अचानक वाढ! युद्धानंतर सुरू असलेल्या घसरणीला ब्रेक, सोनं ५५००ने तर चांदी ११००० रुपयांनी महाग

Karad News : कऱ्हाड - चिपळुण मार्गावरील अवजड वाहतुक बंद; महामार्गाच्या कामासाठी दोन महिने वाहतुकीत बदल

खरातचं कुटुंब परदेशात पलायनाच्या तयारीत? पतीचे कोट्यवधींचे व्यवहार माहिती नाहीत, पत्नीची भूमिका संशयाच्या भोवऱ्यात

SCROLL FOR NEXT