shivrajyabhishek din 2022
shivrajyabhishek din 2022  sakal
महाराष्ट्र

'शिवरायांचं स्वराज्य पुन्हा एकदा निर्माण करण्यासाठी सज्ज होऊया'

संदीप खांडेकर

रायगड : छत्रपती शिवाजी महाराज यांनी स्वाभिमानाशी कधी तडजोड केली नाही, असे सांगत शिवरायांचे स्वराज्य पुन्हा एकदा निर्माण करण्यासाठी सज्ज होऊया, असे आवाहन युवराज संभाजीराजे छत्रपती यांनी आज येथे शिवभक्तांना केले. सरकारने शिवभक्तांच्या सोयी-सुविधांसाठी काय केले, असा प्रश्न उपस्थित करत शिवभक्तांची सोय होत नसेल तर स्वराज्याचा लढा येथूनच सुरू होईल, असा इशारा त्यांनी दिला. अखिल भारतीय शिवराज्याभिषेक महोत्सव समितीतर्फे आयोजित शिवराज्याभिषेक सोहळ्यात ते बोलत होते. राजसदरेवर कार्यक्रम झाला.

संभाजीराजे म्हणाले, शिवाजी महाराज यांनी स्वराज्य का निर्माण केले, याचे चिंतन केले पाहिजे. देशाला पहिले स्वातंत्र्य शिवछत्रपतींनी मिळवून दिले. शिवचरित्रातून काय घ्यायचे, हे शिकायला हवे. स्वराज्य स्थापन करताना त्यांनी प्रस्थापित लोक घेतले नाहीत. निष्ठावंत व प्रामाणिक मावळ्यांना घेऊन स्वराज्याचे स्वप्न साकार केले. शिवरायांच्या विरोधात मुघल, आदिलशाही, कुतुबशाही, निजामशाही होती. शिवरायांना अडविण्यासाठी बाप-लेकांत भांडणे लावण्याचा प्रयत्न त्या काळीही झाला. घरातच फूट पाडण्याचा तो प्रयत्न होता.

ते म्हणाले, राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांचे यंदाचे स्मृती शताब्दी वर्ष आहे. शाहू महाराज जसे समाज सुधारक तसे शिवभक्तही होते. त्यांनी शिवाजी महाराज व ताराराणी यांचा रथोत्सव सुरू केला. जगातील पहिला शिवछत्रपतींचा पुतळा त्यांनीच उभारला. त्याच्या पायाभरणीच्या कार्यक्रमाला ब्रिटनच्या युवराजाला वाकवले. रायगड विकास प्राधिकरणाच्या माध्यमातून गड संवर्धनाचे काम करत असताना राष्ट्रपतींना गडावर आणण्याचे ठरवले होते. गतवर्षी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांना गडावर आणले.

शहाजीराजे यांनी बुद्धी कौशल्याने शत्रूला चकवून शिवाजी महाराज यांना स्वराज्य निर्माण करण्यासाठी रान मोकळे केले. दोघांनी कधीच स्वाभिमानाशी तडजोड केली नाही. वाकायचं नाही, हा धडा त्यांनीच दिला. पुरंदरच्या तहात शिवराय दोन पावले मागे गेले. सन्मान राखला जात नाही, जिथे बंधने घातली जातात, तिथे थांबायचे नाही, हा त्यांचाच वारसा आहे. शिवरायांना कोणाचे मांडलिकत्व नको होते, असेही त्यांनी सांगितले. या वेळी कॉन्झर्व्हेटिव्ह ऑफिसर वरुण भामरे यांचा सत्कार करण्यात आला. समितीचे अध्यक्ष फत्तेसिंह सावंत म्हणाले, "शिवभक्तांवर बंधने वाढत आहे. संभाजीराजे प्रत्येक मावळ्यांच्या ह्दयात असून, शिवभक्त त्यांच्या पाठिशी आहेत.

मी राजसरेवरुन काय बोलणार, माझ्या मनात काय दडलयं, अशी माध्यमांत चर्चा होती. राजसदर देशाला दिशा दाखविण्याचे काम करते. त्यामुळे राजसरेवरुन मी राजकीय वक्तव्य करणार नाही. महाराष्ट्रात अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. त्यात तो जखडला आहे. ते प्रश्न समजावून घेण्यासाठी राज्याचा दौरा काढून सर्वांना भेटायला येणार आहे, असे संभाजीराजे म्हणाले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gulabrao Patil: भाजपवाल्यांनी काम केलं नाही तर आम्ही... गुलाबराव पाटलांच्या वक्तव्यामुळे BJP कार्यकर्त्यांमधे संभ्रम

Bajrang Punia Suspended : बजरंग पुनियाचे स्वप्न भंगले... डोपिंग टेस्ट न केल्याने निलंबित

Summer Fashion Tips : उन्हाळ्यात कूल आणि स्टायलिश दिसायचंय? मग, अशा प्रकारच्या कलर पॅटर्न्सची करा निवड

Raju Shetti in Hatkanangale: 'राजकारणात यायचं म्हणजे गेंड्याची कातडी लागते'; राजकारण की चळवळ, राजू शेट्टींची कशाला पसंती?

Latest Marathi News Live Update : नसीम खान असणार काँग्रेसचे स्टार प्रचारक

SCROLL FOR NEXT