Aditya Thackeray Aditya Thackeray
महाराष्ट्र बातम्या

डोंगर, दऱ्या बघायच्या आहेत तर...; आदित्य ठाकरेंचा बंडखोरांना खोचक टोला

सकाळ डिजिटल टीम

मुंबई : एकनाथ शिंदे यांनी केलेल्या बंडानंतर राज्यातील वातावरण चांगलच तापलं आहे, एकनाथ शिंदे हे सर्व बंडखोर आमदारांसह सध्या गुवाहाटी येथे हॉटेलात आहेत. त्यांच्याकडून सरकरकडून बंडोखोर गटाला सुप्रीम कोर्टाकडून दिलासा मिळाला आहे, 16 बंडखोरांवर 12 जुलैपर्यंत कोणतीही कारवाई विधानसभा उपाध्यक्षांना करता येणार नाही, असे कोर्टाने सांगितलं आहे. या पार्श्वभूमिवर शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांनी बंडखोर आमदारांवर जोरदार टीका केली आहे.

बंड करायचा होता तर मुंबईत राहून करायचा होता. मात्र, तुम्ही तसं केल नाही. बाहेर पळून जाऊन बंड करीत आहात. अशा लोकांना आम्ही सांभाळत आजवर आलो. मोठं करत आलो. विश्वास दाखवला. या आमदारांनी बंड पुकारल्याने नालेसफाईच काम झाल आहे, असा टोला पुन्हा पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी बंडखोरांना लगावला.

शिवसेना नेते आदित्य ठाकरे म्हणाले की, दादागिरीने तुम्ही मन जिंकू शकत नाहीत, लोकं आमच्याकडे येऊन सांगत आहेत की, तुम्ही आमच्याकडे या आम्ही लढाईला तयार आहोत. आमदारांवर हल्लाबोल करताना ते म्हणाले की, हे बंड करायला गेले कुठे तर सुरतेमध्ये, त्यांच्या मनगटात ताकद असती, तर घरात येथे केलं असतं. आपला एक आमदार म्हणतो की काय डोंगर, काय दरी, काय नद्या.. आहो डोंगर, दऱ्या नद्या बघायच्या आहेत तर मग सह्याद्रीतल्या बघा, आमच्या कर्जत, पश्चिम घाटातल्या बघा. इथे मावळे जिवंत होते, इथं तयार झाले होते, याला म्हणतात हिंम्मत, पण कुठे गेले गुजरातेत सुरतमध्ये, असे आदित्य ठाकरे यावेळी म्हणाले.

या सगळ्या ज्येष्ठ नेत्यांच्या आपण साहेब म्हणायचो, खूप लोक जाऊन पाया पडायचे, जे फुटीरवादी पाच-सहा नेते आणि बाकीचे बिचारे फसून त्यांच्यामागे गेले, त्यांना येथे मान सन्मान होता. आपण दुसऱ्या क्रमांकाची जागा त्यांना दिली.सुरतेहून गुवाहाटीला नेतानाचे व्हिडीओ समोर आले त्यापैकी एका व्हिडीओमध्ये जे आमदार इथून गेले त्यांना कैद्यांप्रमाने हाताला, मानेला पकडून नेले याचं मला दुखः वाटतं. महाराष्ट्रातील आमदारांचे सुरतेला गेल्यानंतर असे हाल होतात, यामागे कुठली अदृश्य शक्ती आहे का? पक्ष आहे का? जे म्हणतात पुन्हा येईन-पुन्हा येईन ते आहेत का? कोणीही असलं तरी महाराष्ट्र माफ करणार नाही असे आदित्य ठाकरे म्हणाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Latest Marathi News Live Update : पुणे शहरात उद्यापासून प्रतिबंधात्मक आदेश लागू; परवानगीशिवाय सभा, मिरवणुकांना बंदी

Chandoli Dam Tourists : चांदोली धरणावर दारू पिऊन धिंगाणा घालताय? सावधान! पोलिस, धरण प्रशासन ॲक्शन मोडवर; मद्यधुंद पर्यटकांवर अंकुश

Ambenali Ghat Accident : महाबळेश्वरच्या आंबेनळी घाटात भीषण दुर्घटना ! स्कॉर्पियो ५०० फूट खोल दरीत कोसळली, ८ जणांचा जागीच मृत्यू

Petrol-Diesel Price Today : पेट्रोल-डिझेल दरवाढीचा चौथा धक्का! सर्वसामान्यांचे बजेट कोलमडले, जाणून घ्या तुमच्या शहरातील आजचे ताजे दर

सकाळच्या गडबडीतही फिट राहण्यासाठी झटपट, हेल्दी आणि एनर्जीने भरलेला पीनट-बटर-बनाना रॅप, ५ मिनिटांत होतो तयार

SCROLL FOR NEXT