Video Viral  Sakal
महाराष्ट्र बातम्या

'संतोष बांगर दादुड्या मिशा कधी काढतोय?' आयोध्या पौळ यांचा बांगरांना चिमटा | Video Viral

आयोध्या पौळ यांचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

सकाळ डिजिटल टीम

हिंगोली : हिंगोली येथील शिंदे गटातील आमदार संतोष बांगर यांना कळमनुरी बाजार समितीमध्ये १७ जागांपैकी फक्त ५ जागांवर विजय मिळवता आला आहे. १७ पैकी १७ जागांवर विजय मिळवला नाहीतर मी मिशा काढेन असं वक्तव्य त्यांनी केलं होतं. पण फक्त ५ जागांवर विजय मिळवल्यानंतर त्यांना "मिशा कधी काढणार?" असा सवाल केला जात आहे.

दरम्यान, राज्यभरात कृषी उत्पन्न बाजार समित्याच्या निवडणुका पार पडल्या. त्यामध्ये हिंगोली येथील कळमनुरी बाजार समितीमध्ये १७ पैकी १७ जागांवर विजय मिळवणार असल्याचा दावा बांगर यांनी केला होता. पण त्यांना फक्त ५ जागांवर विजय मिळवता आला आहे. त्यामुळे ठाकरे गटाच्या पदाधिकारी आयोध्या पौळ यांनी त्यांच्यावर निशाणा साधत मिशा कधी काढणार असा सवाल केला आहे.

"दोन दिवसांपूर्वी मी हिंगोलीत होते तेव्हा त्याने माझ्यापासून पळ काढला. माझा दादूड्या तुला चॅलेंज करण्याची मोठी हौस आहे. त्याने निवडणुकीत १७ पैकी १७ जागा निवडूनआल्या नाही तर मिशा काढेन असं चॅलेंज केलं होतं पण आता सांग तू मिशा कधी काढणार आहे? तुझ्यासाठी मी वीस रूपयांचं गिफ्ट आणलं आहे." अशी मिश्कील टिका पौळ यांनी बांगर यांच्यावर केली आहे.

पौळ यांच्या या टीकेचा हा व्हिडिओ त्यांनी ट्वीटरवर पोस्ट केला असून हा व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे. तर राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनीसुद्धा बांगर कधी मिशा काढतात? असा सवाल करत टीका केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT