Eknath Shinde 
महाराष्ट्र बातम्या

Shivsena Dasara Melawa: अखेर शिंदे गटाच्या दसरा मेळाव्याचं ठिकाण ठरलं! 'या' मैदानावर आवाज धडाडणार

कार्तिक पुजारी

मुंबई- अखेर शिवसेनेच्या दसरा मेळाव्याचं ठिकाण ठरलं आहे. शिवसेनेचा दसरा मेळावा 'आझाद मैदान'वर होणार आहे. दसरा मेळावासाठी क्राॅस मैदान व आझाद मैदान ही मैदानं ठरवण्यात आली होती. मात्र शिवसेनेकडून आता आझाद मैदानावर दसरा मेळावा घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. (shivsena cm eknath shinde dasara melawa on azad maidan)

क्राॅस मैदान यावरती क्रिकेटच्या मैदानांचे पिच आणि मैदानांवर नियोजन करण्यात अडचणी येत असल्याने आझाद मैदानवर शिवसेनेचा दसरा मेळावा घेतला जाणार आहे, अशी माहिती देण्यात आली आहे. त्यामुळे अखेर शिंदे गटाला दसरा मेळावा घेण्याचे ठिकाण नक्की झालं आहे. शिवाजी पार्कवर ठाकरे गटाचा दसरा मेळावा होणार असल्याने शिंदे गटाकडून मैदानाचा शोध सुरु होता.

शिवसेनेचा दसरा मेळावा दरवर्षी दादर येथील शिवाजी पार्कवर घेण्यात येतो. मात्र, दोन वर्षांपूर्वी शिवसेनेत फूट पडली. ठाकरे आणि शिंदे असे दोन गट पडले. त्यामुळे या दोन्ही गटाचे वेगवेगळे मेळावे होऊ लागले. मागच्या वर्षी ठाकरे गटाचा शिवाजी पार्कवर दसरा मेळावा झाला. त्यावेळी शिवसेना कोणाची याचा निर्णय झाला नसल्याने ठाकरे गटाला मैदानावर मेळावा घेण्याची परवानगी देण्यात आली होती.

यंदा शिवाजी पार्कवर दसरा मेळावा घेण्यास परवानगी देण्यात यावी यासाठी शिंदे आणि ठाकरे या दोन्ही गटाकडून दोन महिन्यांपूर्वीच महानगरपालिकेकडे अर्ज करण्यात आला होता. पण, नंतर शिंदे गटाकडून अर्ज मागे घेण्यात आला. त्यामुळे शिवाजी पार्कवर यंदाही ठाकरे गटाचा दसरा मेळावा होणार आहे. दुसरीकडे, शिंदे गट कुठे दसरा मेळावा घेईल याबाबत उत्सुकता होती. अखेर यावर पडदा पडला आहे. (Latest Marathi News)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ranji Trophy : मोहम्मद शमीने टप्पात कार्यक्रम केला; MS Dhoni चा पठ्ठ्या शतक झळकावून एकटा नडायला गेला, पण...

Latest Marathi News Live Update : इचलकरंजी एसटी आगार मालामाल! दिवाळीत १ कोटी १२ लाख उत्पन्न जमा

Body Impact Less Sleep: तुम्हीही रात्री फक्त 2 तास झोपताय? जाणून घ्या शरीरावर काय परिणाम होतात

Honesty Story : 'ओवीने प्रामाणिकपणे परत केला सुवर्णहार'; खेळताना सापडला पाच तोळे सोन्याचा हार

Electric Shock: सिव्हर टॅंक रिकामे करताना हेल्परचा विजेच्या धक्क्याने मृत्यू; तिघांविरोधात गुन्हा दाखल

SCROLL FOR NEXT