Balasaheb Thackeray  Sakal
महाराष्ट्र बातम्या

Shivsena : "पैशाशी लाचार व्हाल तर शिवरायांचे नाव घेऊ नका"; ठाकरे गटाने शेअर केला बाळासाहेबांचा व्हिडीओ

आज छत्रपती शिवाजी महाराज यांची तिथीनुसार जयंती असल्याने ट्विट केलं आहे.

सकाळ डिजिटल टीम

छत्रपती शिवाजी महाराजांची आज तिथीनुसार जयंती आहे. त्यानिमित्त ठाकरे गटाकडून एक व्हिडीओ ट्वीट करण्यात आला आहे. या व्हि़डीओमध्ये बाळासाहेब ठाकरे यांचा आवाज वापरण्यात आला आहे. या व्हिडीओच्या माध्यमातून ठाकरे गटाने शिंदे गटाला टोला लगावला आहे.

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार अरविंद सावंत यांच्याकडून हा व्हिडीओ ट्वीट करण्यात आला आहे. या ट्वीटमधून त्यांनी शिंदे गटावर अप्रत्यक्षपणे निशाणा साधला आहे. "पैशाशी जर लाचार व्हाल तर शिवरायांचे नाव घेऊ नका, भगवा झेंडा हातात घेऊ नका हे महाराजांना सुद्धा आवडणार नाही हे ढोंग तुमच्या मराठ्यांच्या रक्तात असता कामा नये एवढी काळजी घ्या, शिवसेनेकडे लोक आदराने पाहतायत हा आदर तसाच ठेवा", असं बाळासाहेब ठाकरे यांच्या आवाजात म्हटलं आहे.

आज छत्रपती शिवाजी महाराजांची तिथीनुसार जयंती आहे. त्यानिमित्ताने राज्यभरात उत्साहाचं वातावरण आहे. विविध ठिकाणी कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे. मुंबईतल्या शिवाजी पार्क इथं राज ठाकरे यांच्यासह अनेक नेत्यांनी हजेरी लावत छत्रपती शिवरायांना अभिवादन केलं. उद्धव ठाकरे यांनीही रश्मी ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांच्यासह छत्रपती शिवरायांना अभिवादन केलं.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Indian Army: देशसेवकाला अखेरचा सलाम! जवान तुषार भिलारेंच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार; कुटुंबीयांचा आक्रोश काळजाला भिडणारा

Delhi Pollution Master Plan : दिल्लीत ५० टक्के कर्मचाऱ्यांना 'WFH' अनिवार्य, पार्किंग शुल्कातही दुप्पट वाढ; प्रदूषण नियंत्रणासाठी नवे धोरण लागू

Pune Highway Upgrade: घोडेगाव–मंचर–बेल्हे महामार्ग विकासाला ४७० कोटींचा मुबलक निधी; भीमाशंकर प्रवास २० किमीने कमी, भाविकांना मोठा दिलासा

Parbhani News: घरी परतताना काळाचा घाला! जिंतूरमध्ये पुराच्या पाण्यात वाहून गेलेल्या शेतकरी महिलेचा दुसऱ्या दिवशी मृतदेह सापडला

Nanded Accident: परभणीच्या कुटुंबावर काळाचा घाला! नांदेडमध्ये अपघातात कुटुंबप्रमुखाचा मृत्यू, पत्नी व दोन मुले गंभीर

SCROLL FOR NEXT