Shivsena News
Shivsena News esakal
महाराष्ट्र

Shivsena News: "हातपाय तोडून हातात देईल, पंतप्रधानांकडे तक्रार कर" शिवसेनेच्या माजी आमदारची ऑडिओ क्लिप व्हायरल

रुपेश नामदास

Shivsena News: शिवसेनेचे माजी आमदार तुकाराम काते एका शिक्षकाला केला असल्याचा एक व्हिडीओ सोशल मिडियावर व्हायरल होते आहे. तुकाराम काते यांनी शिक्षकाला शिवीगाळ केल्याचा आरोप त्यांच्यावर करण्यात आला आहे. २३ महिन्यांचा पगार मागितल्याने शिक्षकाला फोनवर करत शिवीगाळ केली आहे.

मिळालेल्या अधिक माहितीनुसार, शिवसेनेचे माजी आमदार तुकाराम काते यांच्या संस्थेच्या शाळेत काम करणाऱ्या एका शिक्षक कर्मचाऱ्याचा गेल्या २३ महिन्यांपासून वेतन दिलेले नाही. शिक्षक गेल्या २३ महिन्यांपासून विनामोबदला शाळेत शिकवत आहे. त्या शिक्षकांने पगार मागण्यासाठी काते यांना फोन केला होता.

मात्र त्यांना पगार मिळण्या देण्याऐवजी त्यांच्यावर शिव्यांचा वर्षाव झाला. तर पुन्हा पगारासाठी फोन केला तर हात पाय तोडून हातात देईल अशी धमकी देखील त्यांनी दिली. ऑडिओ क्लिपमध्ये तुकाराम काते शिक्षकाला म्हणत आहेत की, पगार देणार नाही पंतप्रधानांकडे तक्रार कर असं म्हणत शिक्षकाला शिवीगाळ करण्यात आली आहे.

ही कथित ऑडिओ क्लिप 1 मिनिटे 37 सेकंदाची आहे. या मध्ये शिक्षक विनोद पोकळे आणि माजी आमदार तुकाराम काते यांच्याच फोन वरून संवाद झाला. शिक्षक विनोद पोकळे हे तुकाराम काते यांच्या संस्थेतील एका शाळेत इंग्रजी माध्यमाचे शिक्षक होते. इयत्ता 8 ते 10 वीच्या वर्गाला शिकवत होते. त्यांना गेल्या २३ महिन्यापासून पगार देण्यात आलेला नाही.

शाळेतील शिक्षक नागेश यांनी पगार देणार नाही, तुला काय करायचं ते कर, असं शिक्षक विनोद पोकळे यांना सांगितल्याचं या संभाषणातून दिसत आहे. पोकळे यांनी अनेक ठिकाणी पगार न मिळाल्याचा गाजावाजा केल्याने काते संतापलेले दिसत आहेत. या संतापाच्या भरातच त्यांनी पोकळे यांना शिवीगाळ केल्याचंही दिसून येत आहे.

टीव्ही 9 मराठीच्या वृत्तानुसार...

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Lok Sabha Hatkanangale: निवडणुकीच्या रिंगणात असलेल्या राजू शेट्टींना चित्रपटात काम करावसं का वाटलं? जाणून घ्या

Gulabrao Patil: भाजपवाल्यांनी काम केलं नाही तर आम्ही... गुलाबराव पाटलांच्या वक्तव्यामुळे BJP कार्यकर्त्यांमधे संभ्रम

Bajrang Punia Suspended : बजरंग पुनियाचे स्वप्न भंगले... डोपिंग टेस्ट न केल्याने निलंबित

Summer Fashion Tips : उन्हाळ्यात कूल आणि स्टायलिश दिसायचंय? मग, अशा प्रकारच्या कलर पॅटर्न्सची करा निवड

Raju Shetti in Hatkanangale: 'राजकारणात यायचं म्हणजे गेंड्याची कातडी लागते'; राजकारण की चळवळ, राजू शेट्टींची कशाला पसंती?

SCROLL FOR NEXT