Aditya Thackeray uddhav Thackeray  sakal
महाराष्ट्र बातम्या

ठाकरे कुटुंबाला दृष्ट लागू नये हाच प्रयत्न; बंडखोर आमदाराचं विधान

शिंदे गटातले आमदार संजय शिरसाट यांनी ट्विटमध्ये उद्धव ठाकरेंचा उल्लेख कुटुंबप्रमुख असा केला होता. काही वेळात ते ट्वीट डिलीटही केलं होतं.

सकाळ डिजिटल टीम

शिंदे गटातले आमदार संजय शिरसाट यांनी उद्धव ठाकरेंना कुटुंबप्रमुख म्हणत ट्विट केलं. काही वेळातच ते डिलीटही केलं, मात्र तोवर ते व्हायरल झालं होतं. त्याच संदर्भात आता शिंदे गटाचे खासदार धैर्यशील माने यांनी एक महत्त्वाचं विधान केलंय. ठाकरे कुटुंबाविरोधात कधीही चुकीचं भाष्य करणार नाही, असं ते म्हणालेत.

आपण उद्धव ठाकरे किंवा ठाकरे कुटुंबाच्या विरोधात नाही, असंही धैर्यशील माने म्हणाले आहेत. एका वृत्तवाहिनीशी बोलताना त्यांनी आपल्या भवाना व्यक्त केल्या आहेत. माने म्हणाले की, माझ्या हातात आजही उद्धव ठाकरेंनी बांधलेलं शिवबंधनच आहे. त्यामुळे उद्धव ठाकरे असो किंवा आदित्य ठाकरे, ठाकरे कुटुंबाविरोधात मी कधीही चुकीचं भाष्य करणार नाही. त्यांच्यावर टीका करणार नाही. ठाकरे घराण्याचा आदर राहील.

माने पुढे म्हणाले की, आमचं पाऊल उद्धव ठाकरेंच्या विरोधात नाही तर आघाडीविरोधात आहे. ठाकरे कुटुंबाला दृष्ट लागू नये हाच आमचा प्रयत्न होता. आमचा लढा सर्वसामान्य शिवसैनिकांसाठीच आहे. ठाकरे कुटुंबाशी माझा जिव्हाळा कायम असेल. आम्हा खासदारांना उद्धव ठाकरेंना सोडायचं नव्हतं. पण राज्यात जी आघाडी झाली ती अनैसर्गिक होती.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pharmacy College Ban: राज्यात नवीन फार्मसी महाविद्यालयांना बंदी! महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय; कारण काय?

IPL 2026: श्रेयस अय्यरची स्पेशल सेंच्युरी! धोनी, रोहित, विराटच्या पंक्तीत मिळवलंय स्थान

'मी अनिल कपूरसारख्या माणसासोबत कधीच लग्न करणार नाही' असं का म्हणाली होती माधूरी?

विवाहित सतीश राजवाडेंसोबत जोडलं गेलेलं मुक्ता बर्वेचं नाव; पत्नीने दिलेली अशी प्रतिक्रिया, म्हणाली, 'मी स्वतः त्याला...'

Nursing Day Celebration: समर्थ इन्स्टिट्यूट ऑफ नर्सिंगमध्ये जागतिक परिचारिका दिन उत्साहात साजरा

SCROLL FOR NEXT