Uddhav Thackeray Vs Eknath Shinde Supreme Court Hearing Sakal Digita
महाराष्ट्र बातम्या

शिवसेनेचा वाद आता घटनापीठाकडे; गुरूवारपासून नवा अध्याय सुरू

दत्ता लवांडे

मुंबई : महाराष्ट्रातील शिवसेना आणि ठाकरे गटाच्या वादावरील सुनावणी सुप्रीम कोर्टाकडून आता पाच सदस्यीय घटनापीठाकडे वर्ग करण्यात आली आहे. त्यासाठी आता शिंदे गट आणि शिवसेनेच्या अस्तित्वाच्या सुनावणीचा नवा अध्याय गुरूवारपासून सुरू होणार आहे. सुप्रीम कोर्टाकडून या घटनापीठावर कोणत्या न्यायमुर्तींची नेमणूक केली जाणार आहे याकडेही सर्वांचे लक्ष लागलेले आहे.

(Shivsena Eknath Shinde Uddhav Thackeray Supreme Court)

दरम्यान, कोर्टाच्या घटनापीठाचा निर्णय येईपर्यंत निवडणूक आयोगाने पक्षासंदर्भात आणि चिन्हासंदर्भात निर्णय देऊ नये असे आदेश कोर्टाने दिले आहेत. त्यामुळे आता घटनापीठाच्या निर्णयानंतर पुढील निकाल लागणार असून या निर्णयाकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे.

शिवसेना पक्षाच्या आणि चिन्हाबाबत आज निवडणूक आयोगाच्या सुनावणीला स्थगिती देण्याचे आदेश कोर्टाने दिले आहेत. त्यामुळे सध्यातरी पक्ष आणि चिन्हबाबत कोणताही निर्णय होणार नसून आता पाच सदस्यीच घटनापीठाने लवकर निर्णय देण्याची मागणी केली जात आहे.

या मुद्दयांवर असणार लक्ष

सुप्रीम कोर्टातील आजची राज्यातील सत्तासंघर्षावर सुनावणी 5 सदस्यीय घटनापीठाकडे वर्ग करण्यात आली असून यामध्ये खालील मुद्द्यांचा प्रामुख्याने विचार केला जाणार आहे.

  • आमदार, खासदारांना अपात्र ठरवण्याचा अधिकार विधिमंडळ/ संसदेकडे आहे का?

  • पक्षाचे चिन्ह, नाव संदर्भात निवडणूक आयोगाच्या निर्णयाला स्थगिती दिली जाणार का ?

  • गटनेते पद राजकीय पक्ष ठरवणार की विधिमंडळ पक्ष यांसह मविआने राज्यपालांकडे दिलेली 12 आमदारांची यादी योग्य की अयोग्य?

  • पक्षविरोधी कारवाया म्हणजे स्वतः मर्जीने पक्ष सोडणे म्हणता येईल का?

  • आदी मुद्यांसह व्हीप बजावण्याचे अधिकार कोणाला?

  • नवीन गट तयार न करणे किंवा पक्ष विलीन करण्याचे पर्याय शिंदे समोर आहेत का?

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

वैभव सूर्यवंशी म्हणजे भारतीय क्रिकेट नाही! १५ वर्षीय खेळाडूला टीम इंडियात संधी देण्याच्या विरोधात उभा राहिला दिग्गज, म्हणाला...

Sinhgad Palace History : सिंहगडावरचा भव्यदिव्य राजवाडा कोणी विकला? थक्क करणारा इतिहास अन् दुर्मिळ फोटो पाहा

Kerala Monsoon Update : माॅन्सूनचा केरळात पोहोचण्याचा मुहूर्त हुकला, महाराष्ट्रात कधी येणार? पुढील 2-3 दिवस काही भागात पावसाची शक्यता

Bashir Badr: “उजाले अपनी यादों के...” म्हणणारा आवाज कायमचा शांत... शायर बशीर बद्र यांचे निधन! प्रसिद्ध शेर आजही लोकांच्या ओठांवर

Latest Marathi News Live Update : ठाण्यात शिवसेनेवर भाजपचं दबाव तंत्राची चर्चा सुरू

SCROLL FOR NEXT