ajit pawar  Esakal
महाराष्ट्र बातम्या

Ajit Pawar: 'अजितदादा अस्वस्थ, काहीही होऊ शकतं', शिंदे गटातील मंत्र्याचं मोठं विधान

अजित पवार यांच्यासह काही आमदार फुटणार असल्याच्या चर्चेवर दिली प्रतिक्रिया

अंकिता खाणे (Ankita Khane)

गेल्या काही दिवसांपासून राज्याच्या राजकारणात मोठ्या घडामोडी घडताना दिसून येत आहेत. अशातच महाविकास आघाडीमध्ये फुट पडणार असल्याच्या चर्चा सुरू असून अजित पवार राष्ट्रवादी सोडून भाजपमध्ये जाणार असल्याच्या चर्चांना उधाण आलं आहे. अजित पवारांच्या या चर्चावर अनेकांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत.

यावर बोलताना शिंदे समर्थक आणि मंत्री दादा भुसे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस आणि अजित पवार यांच्याबाबत मोठं वक्तव्य केलं आहे. अजित पवार यांच्यासह काही आमदार फुटणार असल्याच्या चर्चा गेल्या काही दिवसांपासून सुरू आहेत. यावरून मंत्री दादा भुसे यांना प्रश्न विचारण्यात आला होता. यावर बोलताना दादा भुसे यांनी 'अजित पवार हे अनेक वर्षांपासून अस्वस्थ असल्याचं आपल्याला माहिती आहे'.

'अजित पवार यांच्याबाबत मला माहिती नाही. वरिष्ठ पातळीवर या गोष्टी सुरू आहेत. अजित दादा अस्वस्थ आहेत. गेल्या अनेक वर्षांपासून दादा अस्वस्थ असल्याचं आपल्याला माहिती आहे. त्यामुळे काहीही होऊ शकतं' असं त्यांनी म्हंटलं आहे.

तर दादा भुसे यांनी बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त शुभेच्छा दिल्या आहेत. तर इंदू मिलबाबत बोलताना दादा भुसेंनी म्हटलं की, बाबासाहेब आंबेडकर यांचं स्मारक व्हावं अशी सगळ्यांचीच मागणी आहे. मागच्या काळात ते काम सुरूही झालं. मुख्यमंत्री शिंदे यांनी या कामाची पाहणी केली आहे. मला वाटतं की ते काम लवकरच पूर्ण होईल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CISF जवानाचा सहकाऱ्यांवर गोळीबार, असिस्टंट कमांडंटसह ४ जवानांचा मृत्यू

Vani News : सासरी होणाऱ्या मानहानी अन् छळाला कंटाळून तरुणाने संपविले जीवन; स्टेटसवर व्हिडिओ ठेवत उघड केला प्रकार

Japanese Encephalitis Virus: आसाममध्ये डासांमध्ये जपानी मेंदूज्वराचा जी-१ विषाणू प्रथमच आढळला; ‘एनआयव्ही’ पुण्याचे संशोधन अमेरिकन जर्नलमध्ये प्रकाशित

Gujarat High Court: मोदींचं डिग्री प्रकरण! अरविंद केजरीवालांची याचिका फेटाळली, उच्च न्यायालयाने २५ हजारांचा दंड ठेवला कायम

जनता दुष्काळात, तहसीलदार सुट्टीवर; जिल्हाधिकाऱ्यांनी पदभारच काढून घेतला, अधिकारी उरला नावाला

SCROLL FOR NEXT