Eknath Shinde  Sakal
महाराष्ट्र बातम्या

Maharashtra: ...तर मी विधानसेभेत आत्महत्या करेल; शिंदेंची साथ सोडणाऱ्या देशमुखांचा इशारा

बंडखोरी करून सत्तेत आलेल्या शिंदे गटाने भाजपसोबत हातमिळवणी करून राज्यात सत्ता स्थापन केली.

सकाळ डिजिटल टीम

Nitin Deshmukh News : बंडखोरी करून सत्तेत आलेल्या शिंदे गटाने भाजपसोबत हातमिळवणी करून राज्यात सत्ता स्थापन केली. त्यानंतर विरोधकांनी 50 खोके एकदम ओके अशी जहरी टीका शिंदे गटावर करत आले आहे. मात्र, सुरुवातीला एकनाथ शिंदेंसोबत गेलेले आणि आत पुन्हा शिवसेनेत माघारी गेलेल्या नितीन देशमुखांनी काही गंभीर विधान केले आहेत. त्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. शिंदे गटाचे सूरत ते गुवहाटीमधील अनेक व्हिडीओ आपल्याकडे आहेत, असा दावादेखील देशमुखांनी केला आहे. ते शिवसैनिकांच्या मेळाव्यामध्ये बोलत होते.

देशमुख म्हणाले की, 50 खोके एकदम ओकेचे षडयंत्र गेल्या दीड वर्षांपासून सुरू होते असेही ते म्हणाले. हे सत्तांतर पैशांच्या माध्यमातून झाले आहे. हे मी सिद्ध करेल आणि जर, ते मी सिद्ध करू शकलो नाही, तर मी महाराष्ट्राच्या विधानसभेत आत्महत्या करेल, असा इशारादेखील देशमुखांनी दिला आहे.

काही दिवसांपूर्वी माझी लाचलुचपत विभागाकडून चौकशी करण्यात आली आहे. मात्र, जर माझ्याविरोधात कारवाई केल्यास माझ्याकडे सुरत ते गुवाहाटी दरम्यानचे अनेक व्हिडिओ असून, ते मी सार्वजनिक करेल असा इशारा देशमुखांनी दिला आहे. लाचलुचपत विभागाकडून चौकशी करण्याऐवजी माझी ईडीकडून चौकशी करायला हवी होती, असे झाले असते तर, समाजात माझा मान वाढला असता, अशी खोचक टीकादेखील देशमुखांनी केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

मोठी बातमी : ऋतुराज गायकवाडची भारतीय संघात एन्ट्री; उप कर्णधाराची जबाबदारी, वैभव सूर्यवंशीही संघात...

CNG Shortage: पालघरमध्ये सीएनजीचा तीव्र तुटवडा! ३ किमी लांब वाहनांच्या रांगा, इंधनासाठी ५ तास चालक प्रतिक्षेत

Vaibhav Sooryavanshi : १५ वर्षांचा वैभव फक्त 'ऑरेंज कॅप'च नव्हे, तर ४ मोठे पुरस्कार नावावर करणार... वाचा किती लाख कमावणार?

Repo Rate News: होम लोन आणि FD गुंतवणूकदारांसाठी महत्त्वाची बातमी! RBI व्याजदर बदलणार का? मोठा निर्णय लवकरच

"कास्टिंग काऊचमुळे लेकीने इंडस्ट्री सोडली" अभिनेत्रीने व्यक्त केली खंत "आता जगावंसं वाटत नाही"

SCROLL FOR NEXT