Shivsena
Shivsena 
महाराष्ट्र

स्वबळाचा निर्धार शिवसेनेला तारणार?

संजय मिस्कीन

मुंबई - शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या निधनानंतर शिवसेनेने राजकीय आखाड्यात अनेक आव्हानांचा सामना करीत आपले वर्चस्व आणि अस्तित्व कायम राखले आहे. आता लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुका एकत्र घेऊन शिवसेनेला कोंडीत पकडण्याचा डाव रचला जात आहे. अशा स्थितीत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाची कसोटी असून, त्यांचा स्वबळावर लढण्याचा निर्धार पक्षाला तारणार का, हा प्रश्‍न चर्चेचा आहे. 

युती करणारच नाही, असे उद्धव यांनी ठणकावून सांगितले आहे. स्वबळावर लढताना शिवसेनेसमोर भाजपच्या ‘साम-दाम-दंड’ नीतीचे मोठे आव्हान आहे. भाजप अध्यक्ष अमित शहा यांनी युती करा नाही, तर ‘पटक देंगे’ असा इशारा दिलाय. त्यांच्या राजकारणाची पद्धत आक्रमक आहे. शिवाय शिवसेनेच्या अनेक आमदार आणि विद्यमान खासदारांवर भाजप गळ टाकेल, असेही संकेत आहेत. अशा स्थितीत शिवसेना अभेद्य राखण्याचे आव्हान ठाकरेंसमोर आहे. शिवसेनेकडे उद्धव ठाकरे हे एकमेव प्रचाराचे केंद्रस्थान आहे. २८८ विधानसभा आणि ४८ लोकसभा मतदारसंघांत शिवसेनेच्या प्रचाराचा झंझावात निर्माण करण्यास मर्यादा आहेत. दुसरीकडे काँग्रेस-राष्ट्रवादी एकत्र लढणार असल्याने त्यांचे कडवे आव्हान असू शकते.
 
आक्रमकतेला उत्तर
भाजपच्या आक्रमक पवित्र्याला त्याच आक्रमकतेने प्रत्युत्तर देण्यात उद्धव ठाकरे यांनीदेखील कसूर केली नाही. ‘युतीचा कटोरा घेऊन कोणाच्याही दारात भीक मागायला जाणार नाही,’ ही गर्जना सार्थ ठरवण्यासाठी अनेक आव्हानांना त्यांना तोंड द्यावे लागणार आहे.

भाजपची आक्रमकता
राज्यात विरोधी पक्ष म्हणून २०१४ पर्यंत शिवसेनेचाच मान होता. पण २०१४ मधील अभूतपूर्व यशानंतर भाजपने शिवसेनेच्या वाघाला आव्हान दिले. भाजपचे स्थानिक नेते थेट ‘मातोश्री’चे नाव घेऊन टीका करू लागले. शिवसेनाचा श्‍वास असलेल्या मुंबई महापालिका निवडणुकीतही भाजपने मोठे आव्हान उभे केले. ज्या मुंबईत शिवसेनेच्या होर्डिंग्जवर भाजपच्या नेत्यांना कसेबसे स्थान मिळायचे, त्या अख्ख्या मुंबईमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे ‘होय, हा माझा शब्द आहे,’ अशी भलीमोठी आणि मोक्‍याच्या ठिकाणी होर्डिंग्ज लागली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MNS Avinash Jadhav FIR News: लोकसभेच्या धामधुमीत ठाकरेंच्या शिलेदारावर खंडणीचा गुन्हा; नेमकं प्रकरण काय?

Bhima Koregaon Case: भीमा कोरेगाव प्रकरणात ट्विस्ट, दिल्ली विद्यापीठाचे माजी प्राध्यापक हनी बाबू यांनी मागे घेतला जामीन अर्ज

Bollywood News: व्हॅनिटी व्हॅन, स्टायलिस्ट अन् भरमसाठ फी! फिल्मस्टारवर एका दिवसाला किती पैसे होतात खर्च? वाचून व्हाल थक्क

Video: मुलं आजूबाजूला खेळतायेत अन् कपल्सचा पार्कच्या मधोमध 'रोमान्स'; व्हिडिओ पाहून लोकांचा संताप

Latest Marathi News Live Update : स्मृती इरानी यांच्या विरोधात काँग्रेस नेत्याचा अर्ज दाखल

SCROLL FOR NEXT