Maharashtra Politics Esakal
महाराष्ट्र बातम्या

Maharashtra Politics:'... त्यामुळे तू औकातीत राहा'; आमदाराच्या मुलाने ओमराजेंना भरला दम

ओमराजे निंबाळकर आणि भाजप आमदार जगजित सिंग राणा पाटील यांच्यात काल चांगलीच जुंपली

सकाळ डिजिटल टीम

शिवसेनेच्या ठाकरे गटाचे आमदार ओमराजे निंबाळकर आणि भाजप आमदार राणा जगजीत सिंह पाटील यांच्या काल चांगलीच जुंपली. तर निंबाळकर आणि भाजप आमदार राणा जगजीत सिंह पाटील यांच्या वादात आता राणा पाटलाचे पुत्र मल्हार पाटील यांनी उडी घेतली घेतली आहे. मल्हार पाटील यांनी खालच्या पातळीवर जात ओमराजेंना दम भरला आहे.

काल उस्मानाबाद जिल्ह्यात खासदार ओमराजे निंबाळकर आणि भाजपचे आमदार राणा पाटील यांच्यात चांगलीच जुंपल्याचं पहायला मिळालं. त्यानंतर आता ओमराजे निंबाळकर आणि आमदार राणा पाटील यांच्या वादात राणा पाटील यांचे पुत्र मल्हार पाटील यांनी उडी घेतली आहे. 'ओमराजे औकातीत रहा आणि आम्ही तुझी राहते, घर पुण्यातील फ्लॅट आणि शेती हे माझ्या आजोबाने आम्ही दान केले. तू मुंबईत पोरी घेऊन फिरतोस' अशा एकेरी भाषेत मल्हार पाटील यांनी ओमराजेंवर हल्लाबोल केला आहे.

औकातीत रहा आम्ही तुझे राहते घर शेती पुण्यातील फ्लॅट हे माझ्या आजोबांनी दान केले आहे. तू मुंबई पोरी घेऊन फिरतोस. पाटील कुटुंबाला तुझी अंडी पिले माहीत आहेत. त्यामुळे तू औकातीत राहा, आम्ही संस्कारी लोक आहोत म्हणूनच शांत राहिलो इथून पुढे तू जर काय करशील तर तुझी गाठ मल्हार पाटलांशी असणार आहे असा दम देखील मल्हार पाटील यांनी निंबाळकर यांना दिला आहे.

शिवसेना ठाकरे गटाचे खासदार ओमराजे निंबाळकर आणि भाजप आमदार जगजित सिंग राणा पाटील यांच्यात काल चांगलीच जुंपली. पिकविम्याच्या मुद्द्यावरून उस्मानाबाद जिल्हाधिकारी कार्यालयातच दोघांची शाब्दिक चकमक झाली. 'तू जास्त बोलू नकोस, तू तूझ्या औकातीत राहा' अशी शब्दात खासदार ओम राजे यांनी आमदार राणा यांना सुनावलं आहे. तुझे संस्कार तुझी औकात मला ठाऊक आहे, अशा शब्दात ओमराजे निंबाळकर यांनी आमदार राणा पाटील यांना उत्तर दिलं आहे.

शिवसेना ठाकरे गटाचे खासदार ओमराजे निंबाळकर आणि भाजपचे आमदार जगजित सिंग राणा पाटील यांच्यात जिल्हाधिकारी कार्यालयात हमरी-तुमरी झाल्याचं पाहायला मिळालं. आज जिल्हाधिकारी कार्यालयासमोर पीक विमा संदर्भात बैठकीत त्यांनी गोंधळ घालायला सुरू केला. त्यानंतर त्यांच्यामध्ये वाद झाल्याचं समोर आलं आहे. ठाकरे गटाचे खासदार आणि भाजप आमदार यांच्यातील शाब्दिक चकमकीचा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

हे ही वाचा : वाचा किस्से बँकेच्या लाॅकररुममध्ये घडलेले...एका बँक अधिकाऱ्याच्याच तोंडून

आज जिल्हाधिकारी कार्यालयात पीक विमा संदर्भात बैठक घेण्यासाठी शेतकऱ्यांनी गोंधळ घालायला सुरवात केली. त्यानंतर त्यांच्यात वाद झाला. आज जिल्हाधिकारी कार्यालयात पीक विम्याच्या खरीप हंगामात झालेल्या नुकसान या संदर्भात बैठक बोलावण्यात आली होती. यासंदर्भात आमदार जगजित सिंग राणा पाटील यांनी काही शेतकऱ्यांना निरोप दिला. यामुळे काही शेतकरी जिल्हाधिकारी कार्यालयात हजर झाले. साधारण 11 वाजण्याची वेळ या ठरली होती. परंतु 1 वाजले तरी बैठक सुरू झाली नाही. त्यामुळे शेतकऱ्यांनी गोंधळ घालायला सुरवात केली. दरम्यान या बैठकीत दोन्ही नेते हमरीतुमरीवर आल्याचं पाहायला मिळालं.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Government Job: एकाच पदासाठी वेगवेगळ्या परीक्षा नको, शुल्कही वाचणार! मंत्री शेलार यांची विधानसभेत माहिती

Mobile App to Predict Cancer Risk: कर्करोगाचा अंदाज आता मोबाईलवर! टाटा रुग्णालयातील संशोधकांची निर्मिती; जोखमीचे मूल्यांकन शक्य

Pune University flyover: पुण्यातील विद्यापीठ चौकाच्या उड्डाणपुलावरुन जाताना उडतोय गोंधळ; अर्धवट कामामुळे अपघाताचा धोका

उन्हाचा तडाखा वाढला! दिवसभरात प्या ४ लिटर पाणी, जिल्हा रुग्णालयात उष्माघात कक्ष, नागरिकांनी लहान मुलांची, ज्येष्ठांची कशी घ्यावी काळजी? वाचा...

Akola News : टी-२० विजयाच्या जल्लोषानंतर अकोल्यात तणाव; दोन गटात वादः वाहनांची तोडफोड, दगडफेकीत नुकसान

SCROLL FOR NEXT