sanjay raut esakal
महाराष्ट्र बातम्या

नाशिकमध्ये यंदा शिवसेना सत्तास्थानी असणार - संजय राऊत

विक्रांत मते

नाशिक :शिवसेना विरोधी पक्षात असताना हा कामाचा डोंगर उभा दिसला. नगरसेवकांनाही कामे पुढे घेऊन जाणार आहे. विरोधी पक्षातील शिवसेना सत्तास्थानी असेल. कामाच्या माध्यमातून लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी लागेल. प्रत्येक दिवस व क्षण कामात घालवा. मुंबईनंतर नाशिकला आल्यावर कामे प्रामुख्याने मला दिसत आहे असा विश्वास शिवसेना नेते खासदार संजय राऊत (mp sanjay raut) यांनी आज (ता.२३) व्यक्त केला, महापालिका निवडणुकीसाठी शिवसैनिक सज्ज झाले आहेत. निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर खासदार राऊत यांच्या दोन दिवसांच्या दौऱ्याला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. नाशिकमध्ये दोन दिवस विविध विकासकामांचे उद्‌घाटन व शिवसैनिकांचा संवाद मेळावा आयोजित करण्यात आला आहे, या कार्यक्रमाप्रसंगी ते बोलत होते

विकास कामे म्हणजे काय तसेच इथले शिवसेनेचे नगरसेवक काय करू शकतात हे नाशिकमध्ये आल्यावर समजले. यंदा नाशिकमध्ये शिवसेना सत्तास्थानी राहणार असा विश्वास देखील त्यांनी व्यक्त केला. तसेच कामाच्या माध्यामतून आपल्याला लोकांपर्यंत पोहचावे लागेल. ही कामे म्हणजेच शिवसेनेची ओळख असल्याचे राऊत यांनी सांगितले

नाशिक महापालिका निवडणूक अवघ्या चार महिन्यांवर असून, 'मिशन महापालिके'चा भाग म्हणून शिवसेना नेते व खासदार संजय राऊत नाशिकच्या मैदानात उतरले आहेत. २२ ते २४ ऑक्टोबर असे तीन दिवस राऊत नाशिक दौऱ्यावर आले आहेत. महापालिकेसोबतच जिल्हा परिषद निवडणुकांच्या प्रचाराचाही बिगूल ते वाजविणार आहेत.

नाशिक महापालिकेची सार्वत्रिक निवडणूक फेब्रुवारी २०२२ मध्ये होणार आहे. महापालिकेत भाजपची एकहाती सत्ता असून, ही सत्ता मिळवण्यासाठी शिवसेनेने मोर्चेबांधणी सुरू केली आहे. नाशिक महापालिकेवर भगवा फडकवण्याची घोषणा संजय राऊत यांनी सहा महिन्यांपूर्वीच केली आहे. त्यानंतर संघटनात्मक फेरबदल केल्यानंतर राऊत यांनी नाशिकमध्ये लक्ष घातले आहे. शुक्रवार (ता. २२) पासून राऊत नाशिक दौऱ्यावर आले आहेत. शनिवारी (ता. २३) शहरात त्यांच्या उपस्थितीत विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत. शिवसेना नगरसेवकांच्या प्रभागातील विकासकामांचे उद्घाटन त्यांच्या हस्ते होणार आहे. सायंकाळी चार वाजता नगरसेवक, पदाधिकारी यांच्यासह कार्यकर्त्यांशी ते संवाद साधतील. या संवाद मेळाव्याच्या माध्यमातून निवडणुकीच्या प्रचाराचा नारळ राऊत फोडणार आहेत. हा मेळावा यशस्वी करण्यासाठी शिवसेनेचे पदाधिकारी कामाला लागले आहेत. दरम्यान, मनसेनेही नाशिकचा गड परत मिळवण्यासाठी मोर्चेबांधणी केली आहे. राज ठाकरेंनीही आपल्या फेऱ्या वाढवल्या आहेत. भाजपनेही आपला गड कायम राखण्यासाठी छुप्या पद्धतीने व्यूहरचना आखण्यास सुरुवात केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

अखेर तोडगा निघाला! बेस्ट कर्मचाऱ्यांचा संप मागे; महायुती सरकारने मान्य केल्या प्रमुख मागण्या, वेतनवाढ आणि ग्रॅच्युइटीवर निर्णय

T20 WC, IND W vs SA W: भारताचे सेमीफायनलचे गणित मारिझान कापच्या 'वन वुमन शो'मुळे बिघडले! दक्षिण आफ्रिकने मँचेस्टरमध्ये दिली मात

Khadakwasla Rain Update: खडकवासला धरण परिसरात तासाभरात ३० मिमी पाऊस; पाणीसाठ्यात वाढ नाही, रस्त्यांवर पाणी साचल्याने वाहतूक कोंडी

Sangli Crime Twist: वेदांत बंडगर खून प्रकरणाला नवे वळण; कुख्यात गुंड म्हमद्या नदाफ अटकेत, पोलिस कोठडीचे अधिकार राखून कारागृहात रवानगी

Paithan Road Crash : पैठण तालुक्यात भीषण अपघात; भरधाव पिकअपच्या धडकेत एकाच कुटुंबातील चौघांचा मृत्यू, दोन बालकांची प्रकृती गंभीर

SCROLL FOR NEXT