Uddhav Thackeray Sakal
महाराष्ट्र बातम्या

Shivsena: ठाकरेंच्या अडचणी संपता संपेनात! मशाल चिन्हावरही समता पार्टीचा दावा

दत्ता लवांडे

मुंबई : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या उद्धव ठाकरे यांच्या पक्षासमोरी अडचणी वाढतंच चालल्या आहेत. अंधेरी पोटनिवडणूक तोंडावर आली असतानाच ठाकरे यांच्या गटाला निवडणूक आयोगाने बहाल केलेल्या मशाल या चिन्हावर समता पार्टीने दावा केला आहे. हे चिन्ह आमचे असल्याचा दावा समता पार्टीच्या नेत्यांनी केल्यामुळे ठाकरेंच्या अडचणीत पुन्हा वाढ झाली आहे.

(Andheri By-Election Shivsena Latest Updates)

दरम्यान, १९९६ पासून हे चिन्ह आपल्याकडे असल्याचं सांगत समता पार्टीने निवडणूक आयोगाकडे धाव घेतली आहे. यावर आज निर्णय अपेक्षित असून अंधेरी पूर्व पोटनिवडणुकीत उमेदवार देणार असल्याची घोषणाही समता पार्टीने केली आहे. "२००४ मध्ये समता पक्षाची राज्य पक्ष म्हणून मान्यता काढून घेत असल्याचं सांगत निवडणूक आयोगाने ठाकरे गटाला मशाल हे चिन्ह बहाल केलं" अशी प्रतिक्रिया समता पार्टीचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष तृणेश देवळेकर यांनी दिली आहे. याप्रकरणी आपण निवडणूक आयोगाला इमेल पाठवून चिन्हावर हक्क सांगितला असल्याचं त्यांनी सांगितलं.

ठाकरे गटाच्या उमेदवाराची उमेदवारी अडचणीत

अंधेरी पूर्व येथील शिवसेनेचे आमदार रमेश लटके यांचे निधन झाल्यानंतर पोटनिवडणूक जाहीर झाली आहे. त्यानंतर उद्धव ठाकरे गटाने त्यांच्या पत्नी ऋतुजा लटके यांना उमेदवारी जाहीर केली आहे. पण त्यांचा महानगरपालिका कर्मचारी पदाचा राजीनामा अद्याप मान्य न झाल्याने त्यांच्या उमेदवारीवर टांगती तलवार आहे. तर शिंदे गटाकडून लटके यांना आपल्या गटात खेचण्याचा प्रयत्न केला जात असल्याची चर्चा सुरू झाली आहे.

दरम्यान, शिवसेना कुणाची हा वाद निवडणूक आयोगाकडे गेल्यावर आयोगाने सेनेचे धनुष्यबाण हे चिन्ह गोठवले होते. त्यानंतर दोन्ही गटाला वेगळे चिन्ह बहाल करण्यात आले होते. ठाकरे गटाला मशाल हे चिन्ह आणि 'शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे' हे नाव देण्यात आले आहे. तर एकनाथ शिंदे गटाला ढाल तलवार हे चिन्ह आणि 'बाळासाहेबांची शिवसेना' हे नाव देण्यात आले आहे. त्यानंतर आता उद्धव ठाकरे यांच्यासमोर पुन्हा अडचणी निर्माण झाल्या आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT