अल्पवयीन मुलींच्या प्रसुती

 

solapur sakal

महाराष्ट्र बातम्या

रुग्णालयातील नोंदीत धक्कादायक प्रकार! प्रसूतीवेळी आधारकार्डशिवाय नोंदविले महिलांचे अंदाजे वय; बालमाता शोधण्यासाठी डॉक्टरांची 7 पथके, वाचा...

बालमातांचा धक्कादायक प्रकार समोर आल्यानंतर महापालिका आयुक्तांनी महापालिकेसह शहरातील सर्वच रुग्णालयातील २०२५ व २०२६ या वर्षातील प्रसूतीच्या नोंदी तपासण्याचे आदेश दिले आहेत. त्यासाठी डॉक्टरांच्या नेतृत्वात सात पथके नेमली आहेत. बहुतेक रुग्णालयांकडील प्रसूत महिलांचे वय आधारकार्डशिवाय अंदाजे नोंदविल्याच्या बाबी निदर्शनास येत आहेत.

तात्या लांडगे

तात्या लांडगे

सोलापूर : बालमातांचा धक्कादायक प्रकार समोर आल्यानंतर महापालिका आयुक्तांनी महापालिकेसह शहरातील सर्वच रुग्णालयातील २०२५ व २०२६ या वर्षातील प्रसूतीच्या नोंदी तपासण्याचे आदेश दिले आहेत. त्यासाठी डॉक्टरांच्या नेतृत्वात सात पथके नेमली आहेत. बहुतेक रुग्णालयांकडील प्रसूत महिलांचे वय आधारकार्डशिवाय अंदाजे नोंदविल्याच्या बाबी निदर्शनास येत आहेत.

सोलापूर शहरातील सिव्हिल हॉस्पिटल, श्री मार्कंडेय हॉस्पिटल आणि महापालिकेचे भावनाऋषी व साबळे नागरी आरोग्य केंद्रासह अन्य ठिकाणी या ३५ बालमातांची प्रसुती व प्रसूतिपूर्व तपासणी झाली आहे. रुग्णालयांनी त्यासंदर्भात कोणतीही कारवाई न केल्याने त्या रुग्णालयाच्या तत्कालीन वैद्यकीय अधिकाऱ्यांविरुद्ध देखील गुन्हे दाखल केले जात आहेत. मात्र, महापालिकेच्या जन्म-मृत्यू विभागाकडे ही माहिती असतानादेखील त्यांनी पोलिसांना का कळविले नाही, हा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

करमाळ्यातील महात्मा फुले समाजसेवा मंडळ संस्थेच्या जिल्हा समन्वयक रजनीगंधा गायकवाड यांनी ती माहिती ‘आरटीआय’मधून मागितली होती. त्यावेळी हा गंभीर प्रकार उजेडात आला. आता महापालिका आयुक्तांनी नेमलेल्या डॉक्टरांच्या सात पथकांच्या अहवालात आणखी किती बालमातांच्या नोंदी सापडणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. मात्र, या नोंदी तपासताना प्रसूत महिलांच्या आधारकार्डची पडताळणी करून वयाची खात्री करावी लागणार आहे.

अहवालानंतर पुढील कार्यवाही

दोन वर्षांपूर्वीच्या ३५ बालमातांचा सखोल अहवाल द्यावा. महापालिकेच्या दवाखान्यासह शहरातील सर्वच महिला रुग्णालयातील प्रसूतीच्या संशयित नोंदी तपासण्याचे आदेश दिले आहेत. त्याचा अहवाल संबंधित पथकांकडून प्राप्त झाल्यावर पुढील कार्यवाही केली जाईल.

- डॉ. सचिन ओम्बासे, महापालिका आयुक्त, सोलापूर महापालिका

वळसंग, मोहोळ अन्‌ कोल्हापूर, पुण्यातील बालमाता

महापालिकेच्या जन्म-मृत्यू विभागाने महात्मा फुले समाजसेवा मंडळ या संस्थेला दिलेल्या माहितीनुसार २०२५ व २०२६ या काळातील ८५ बालमाता आहेत. महापालिकेच्या नागरी आरोग्य केंद्रांमध्ये उपचार घेतलेल्या अल्पवयीन मुलींची संख्या ३५ आहे. बाकीच्या ५० विवाहित अल्पवयीन मुलींनी खासगी व सहकारी रुग्णालयात उपचार घेतल्याचे त्या माहितीत नमूद आहे. विशेष बाब म्हणजे यातील काही बालमाता वळसंग (ता. दक्षिण सोलापूर), मोहोळ, कोल्हापूर, पुणे (आंबेगाव) येथील असल्याचे समोर आले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune News : पुण्यातील ‘रामा’ला कोण वाचविणार? आयुक्तांना दिलेल्या धमकीचा विरोधीपक्षाकडून निषेध

Asian Games: नीरु धंडानंतर भारताच्या महिला रिले संघालाही सुवर्णपदक! गुलवीरची हॅट्रिक, तर दिवसभरात भारताला ८ मेडल्स

Marathi News Live Updates: प्रियकराच्या त्रासाला कंटाळून विवाहितेने दिला जीव

Cyber Loot : काही मिनिटांत खाते रिकामे; केरळमध्ये ७५० कोटींची सायबर लूट; डिजिटल अटक, बनावट पोलिस आणि ऑनलाइन गुंतवणुकीच्या आमिषातून फसवणूक

CSMT Mega Block : सीएसएमटीवर ७५ दिवसांचा ब्लॉक; आठ मेल-एक्स्प्रेस दादर, ठाण्यातच थांबणार, १ ऑक्टोबरपासून प्रवाशांना फटका

SCROLL FOR NEXT