naac notices to non-assessed colleges Higher Education esakal
महाराष्ट्र बातम्या

धक्कादायक प्रकार! २२ महाविद्यालयांचे ‘नॅक’ मूल्यांकन नाही, तुकडीला परवानगी नसतानाही दिले ११० टक्के वाढीव प्रवेश

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाशी संलग्नित जवळपास २२ महाविद्यालयांवर कारवाईची शक्यता आहे. तुकडीला कोणाचीही मान्यता न घेता नियम डावलून ४० ते ११० टक्के वाढीव प्रवेश दिल्याचीही गंभीर बाब समोर आली आहे.

तात्या लांडगे

सोलापूर : नॅक मूल्यांकन करून न घेतलेल्या महाविद्यालयांवर राज्य शासनाच्या निर्देशाप्रमाणे कारवाई होणार आहे. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाशी संलग्नित जवळपास २२ महाविद्यालयांवर कारवाईची शक्यता आहे. तुकडीला कोणाचीही मान्यता न घेता नियम डावलून ४० ते ११० टक्के वाढीव प्रवेश दिल्याचीही गंभीर बाब समोर आली आहे. २५ सप्टेंबरला होणाऱ्या विद्या परिषदेच्या बैठकीत अंतिम निर्णय ठरणार आहे.

उच्च शिक्षणाचा दर्जा सुधारावा, विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळावे, पायाभूत सुविधा मिळाव्यात, यासंदर्भात बंगळुरूच्या नॅक कमिटीकडून मूल्यांकन होत असते. त्यांच्याकडून मूल्यांकन करून घेतलेल्या महाविद्यालयांना शासनाकडून वेगवेगळ्या योजनांमधून निधी दिला जातो. मात्र, विद्यापीठाशी संलग्नित काही अनुदानित व विनाअनुदानित महाविद्यालयांनी नॅक मूल्यांकनच करून घेतलेले नाही.

दुसरीकडे दहा टक्के नैसर्गिक प्रवेश वाढीला परवानगी असतानाही अनेक महाविद्यालयांनी तब्बल ११० टक्क्यांपर्यंत प्रवेश वाढविल्याची गंभीर बाब समोर आली आहे. अशा महाविद्यालयांवर कडक स्वरूपाची कारवाई होणार असून त्यांची यादी तयार करण्यात आली आहे. आता सुरवातीला त्यांना कारणे दाखवा नोटीस बजाविली जाणार आहे. समाधानकारक उत्तर न दिलेल्या महाविद्यालयांचे प्रस्ताव विद्यापीठाकडून उच्च शिक्षण मंत्रालयाकडे पाठविले जाणार आहेत.

कुलगुरुंनी शोधली निकालास विलंबाची कारणे...

काही सत्र परीक्षांचा निकाल १० ते ३० दिवसांत जाहीर होतो तर काही परीक्षांच्या निकालास विलंब होतो, अशी स्थिती मागील काही वर्षांपासून सुरु आहे. विद्यापीठाचे प्रभारी कुलगुरु डॉ. राजनीश कामत यांनी त्याची कारणे शोधली. त्यावेळी काही महाविद्यालयांमध्ये प्रथम वर्षाची तुकडी विनापरवाना सुरु करण्यात आली असून द्वितीय वर्षाची तुकडी देखील तशीच चालविली जात असल्याची बाब समोर आली. त्यामुळे उत्तरपत्रिका तपासणारे, तत्पूर्वी अध्यापन करणारे प्राध्यापक तेवढेच असतात, मात्र विद्यार्थी वाढलेले असतात, हेही समोर आले. त्यामुळे आता अशा महाविद्यालयांवर दंडात्मक कारवाई केली होऊ शकते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Weather : उत्तरेत थंडीची लाट तर दक्षिणेत पावसाचा कहर; महाराष्ट्रात पुढील तीन दिवस कसे असेल हवामान? जाणून घ्या

Satara News: सातारा जिल्ह्यातील ‘जयवंत शुगर’, ‘ग्रीन पॉवर’ला ३८ लाखांचा दंड; साखर आयुक्तांचे आदेश, नेमकं काय कारण?

Panchang 18 December 2025: आजच्या दिवशी दत्त कवच स्तोत्राचे पठण व ‘बृं बृहस्पतये नमः’ या मंत्राचा जप करावा

फायद्याची बातमी! नोटरी केलेल्या गुंठेवारीची आता करता येणार खरेदी; पूर्वीच्या गुंठ्याची करता येणार थेट विक्री, कशी असणार प्रक्रिया, वाचा...

ढिंग टांग - सं. मनोमीलन : अंक दुसरा..!

SCROLL FOR NEXT