महाराष्ट्र बातम्या

#MarathaKrantiMorcha बेल्ह्यातील दोन तरुणांचे ‘शोले स्टाइल’ आंदोलन

सकाळवृत्तसेवा

आळेफाटा - बेल्हे (ता. जुन्नर) येथे मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी दोन तरुणांनी एका बंद अवस्थेतील विजेच्या मनोऱ्यावर चढून ‘शोले स्टाइल’ आंदोलन केले. सुमारे तीन तासांनंतर पोलिसांच्या आवाहनाला प्रतिसाद देत प्रशासनास निवेदन देऊन त्यांनी आंदोलन मागे घेतले.

बेल्हे येथे आज (ता. १) सर्वपक्षीय कार्यकर्ते व ग्रामस्थांनी सकल मराठा समाजाच्या वतीने आयोजित ‘जुन्नर बंद’ आंदोलनात सहभागी होत गावात शांततेत उत्स्फूर्तपणे कडकडीत बंद पाळला. येथील कैलास औटी व शरद औटी या दोन तरुणांनी सकाळी १० वाजण्याच्या सुमारास श्री मुक्ताबाई मंदिरामागे असलेल्या वळण बंधाऱ्याजवळच्या बंद अवस्थेतील उंच मनोऱ्यावर चढून भगवे झेंडे फडकावत ‘शोले स्टाइल’ आंदोलन केले. या वेळी मोठ्या संख्येने नागरिकांनी गर्दी केली होती. त्यानंतर जवळपास तीन तासांनी दुपारी एक वाजण्याच्या सुमारास पोलिसांच्या आवाहनाला प्रतिसाद देत त्यांनी मनोऱ्यावरून खाली उतरून प्रशासनास निवेदन देत आंदोलन मागे घेतले. 

याप्रसंगी मंचरचे उपविभागीय अधिकारी अजित देशमुख, जुन्नरच्या उपविभागीय पोलिस अधिकारी दीपाली खन्ना, आळेफाटा पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक गणेश उगले, गावकामगार तलाठी रोहिदास वामन, आर. सी. कुमावत, पोलिस पाटील बाळकृष्ण शिरतर आदी उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

12 वर्षांच्या निष्ठेचा सन्मान! जातेगावचे कैलास उगले ठरले मानाचे वारकरी; आषाढी एकादशीला मुख्यमंत्र्यांसोबत शासकीय महापूजेचा मिळाला मान

Ashadhi Ekadashi : 'ज्ञानोबा माऊली'च्या गजरात CM देवेंद्र फडणवीस अन् अमृता फडणवीस यांनी धरला फुगडीचा फेर; पारंपरिक वेशात घेतला सहभाग

Ashadhi Ekadashi 2025 Live Updates : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस विठ्ठल मंदिरात दाखल, महापूजेला सुरुवात

MK Stalin Reaction : ठाकरे बंधूंच्या मेळाव्यावर आता CM स्टॅलिन यांचीही आली प्रतिक्रिया; केलंय मोठं विधान!

IND vs ENG 2nd Test: भारताची ऐतिहासिक विजयाच्या दिशेने कूच! Akash Deep चा भेदक मारा, इंग्लंडची उडवली झोप

SCROLL FOR NEXT