zp schools sakal
महाराष्ट्र बातम्या

इयत्ता पहिली ते पाचवीसाठी हिंदी तिसरी भाषा हवी की नको? त्रिभाषा समितीच्या बैठका सुरू, २१ नोव्हेंबरला समिती सोलापूर दौऱ्यावर

राष्ट्रीय शिक्षण धोरणानुसार राज्य सरकारने त्रिभाषा सूत्राचा अवलंब केला. त्यानुसार शासन निर्णय काढत पहिली ते पाचवीच्या वर्गासाठी हिंदी भाषा निवडली. त्याला विरोध झाल्याने राज्य सरकारने शासन निर्णय रद्द केला. त्यानंतर अभ्यास करून अहवाल देण्यासाठी सरकारने शिक्षणतज्ज्ञ डॉ. नरेंद्र जाधव यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमली. ही समिती वेगवेगळ्या विभागात, जिल्ह्यांमध्ये जाऊन विविध घटकांची मते जाणून घेत आहे.

तात्या लांडगे

तात्या लांडगे

सोलापूर : राज्य सरकारने नेमलेल्या त्रिभाषा समितीची आज (गुरूवारी) पुणे विभागाची बैठक पार पडली. त्यावेळी शिक्षणाधिकाऱ्यांसह कलाकार, कलावंत, साहित्यिक, शिक्षणतज्ज्ञ, सामान्य लोक, पालक असे वेगवेगळे घटक उपस्थित होते. समितीने सर्वांची मते जाणून घेतली. लिखित प्रश्नावली देऊन त्यांच्या अपेक्षा व मते जाणून घेतली. प्राथमिक स्तरावर विद्यार्थ्यांसाठी तिसरी भाषा हिंदी हवी की नको, असेल तर काय फायदे-तोटे होतील, असे प्रश्नावलीचे स्वरूप होते, अशी माहिती माध्यमिक शिक्षणाधिकारी सचिन जगताप यांनी दिली.

राष्ट्रीय शिक्षण धोरणानुसार राज्य सरकारने त्रिभाषा सूत्राचा अवलंब केला. त्यानुसार शासन निर्णय काढत प्राथमिक स्तरावर इयत्ता पहिली ते पाचवीच्या वर्गासाठी हिंदी भाषा निवडली. त्याला विरोध झाल्याने राज्य सरकारने शासन निर्णय रद्द केला. त्यानंतर त्यावर अभ्यास करून अहवाल देण्यासाठी राज्य सरकारने शिक्षणतज्ज्ञ डॉ. नरेंद्र जाधव यांच्या अध्यक्षतेखाली त्रिभाषा समिती नेमली. ही समिती वेगवेगळ्या विभागात, जिल्ह्यांमध्ये जाऊन विविध घटकांची मते जाणून घेत आहे.

गुरूवारी पुण्यात समितीची बैठक झाल्यानंतर समिती २१ नोव्हेंबर रोजी सोलापूर दौऱ्यावर येणार असल्याचेही श्री. जगताप यांनी सांगितले. दरम्यान, पुढील शैक्षणिक वर्ष सुरू होण्यापूर्वी समितीचा अहवाल सरकारला सादर होणार आहे. तत्पूर्वी, विविध घटकांमधील लाखो लोकांची मते समिती जाणून घेत आहे. त्यानुसार राज्य सरकारचा पुढचा निर्णय होणार आहे. त्यावेळी हिंदी तिसरी भाषा असणार की नाही, हे ठरणार आहे.

सोलापूर बहुभाषिक, हिंदीबद्दल जाणून घेतली जाणार मते

सोलापूर हे बहुभाषिकांचे शहर आहे. सोलापूर शहरातील वेगवेगळ्या घटकांची मते जाणून घेण्यासाठी २१ नोव्हेंबर रोजी सकाळी १० वाजता समिती सोलापुरात येणार आहे. त्यावेळी फेरीवाल्यांसह शहरातील साहित्यिक, नाट्यकलावंत, पालक, सामान्य लोकांसह विविध समाजातील पदाधिकाऱ्यांशी हिंदी भाषा प्राथमिक शिक्षण स्तरावर असावी की नको, याबद्दल संवाद साधला जाणार आहे. बैठकीचे व्हिडिओ रेकॉर्डिंग केले जाणार असून उपस्थितांकडून प्रश्नावली देखील भरून घेतली जाणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

पुण्यात २ तरुणींचा १९ वर्षीय तरुणावर पहाटे कोयत्यानं हल्ला, घटना CCTVत कैद; धक्कादायक कारण समोर

Dodamarg Eco-Sensitive Area : 'महाराष्ट्राचे ॲमेझॉन' धोक्यात! केंद्राकडून दोडामार्ग तालुका वगळण्याची 'घोड चूक'; वनशक्ती संस्थेचे सरकारला थेट पत्र

Kolhapur Voter List Revision : कोल्हापूर जिल्ह्यातील साडेचार लाख मतदार वगळणार; 'एसआयआर'चे 99.91 टक्के काम पूर्ण, पाहा विधानसभा मतदारसंघनिहाय चित्र

Marathi News Live Updates : भोर तालुक्यातील खड्ड्यांमध्ये भात लावून विद्यार्थ्यांनी वेधले प्रशासनाचे लक्ष

World Record Tiranga Rally: डोंबिवलीत तिरंग्याचा विश्वविक्रमी डौल, ३५ हजार चौरस फुटांच्या ध्वजासह भव्य रॅली

SCROLL FOR NEXT