Indapur Sugar Factory Election sakal
महाराष्ट्र बातम्या

Indapur: छत्रपती कारखान्यात धुरळा उडणार! तीन वर्ष लांबलेली निवडणूक होणार; न्यायलयाचा मोठा निर्णय

रुपेश नामदास

इंदापूर तालुक्यातील भवानीनगर मधील श्री छत्रपती सहकारी साखर कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणुकीचा मार्ग मोकळा झाला आहे.

उच्च न्यायालयात प्रलंबित असलेल्या याचिकेवर न्यायालयाने निकाल दिला असून पुढील चार आठवड्याच्या आत निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर करण्याचे आदेश निवडणूक प्राधिकरणाला दिले आहेत.

छत्रपती सहकारी साखर कारखान्याच्या संचालक मंडळाची मुदत २४ एप्रिल 2020 रोजी संपली होती. निवडणुकीची प्रक्रिया ही सुरू झाली होती.

मात्र कारखान्याचे माजी अध्यक्ष पृथ्वीराज जाचक यांनी न्यायालयामध्ये एक याचिका दाखल केली होती. की, सुमारे 25000 सभासदांची प्रारूप यादी प्रसिद्ध झाल्यानंतर सलग तीन वर्षे ऊस पुरवठा न करणाऱ्या व थकबाकीदार सभासदांना मतदानाचा अधिकार देण्यात येऊ नये.

कोरोनाच्या काळामुळे संचालक मंडळाला मुदतवाढ मिळाली होती. त्यानंतर ऑक्टोंबर 2022 मध्ये कारखान्याच्या संचालक मंडळाची मुदत संपली आहे. त्यानंतर संचालक मंडळाच्या वतीने निवडणूक घेण्यासाठी याचिका दाखल केली होती.

उच्च न्यायालयाचे के .आर. श्रीराम व न्यायमूर्ती राजेश पाटील यांच्या दोन सदस्य खंडपीठाने छत्रपती कारखान्याच्या निवडणुकी संदर्भातील याचिकेवरती सुनावणी करताना कारखान्याच्या निवडणुकीचा कार्यक्रम चार आठवड्याच्या आत जाहीर करण्याचे आदेश निवडणूक प्राधिकरणाला दिले आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Iran US Conflict : अमेरिकेला इराणचे थेट आव्हान; ‘युद्धाची खरंच तयारी असेल तर जमिनीवर सैन्य उतरवा’

Neighboring Countries: शेजारील देशांना एकाच पारड्यात तोलू नका

Realme Smartphone: हॅरी पॉटर चाहत्यांसाठी खूशखबर! Realme 16 Proचे लिमिटेड एडिशन Flipkartवर होणार लाँच; पाहा फीचर्स!

S Jaishankar SIR Notice : परराष्ट्रमंत्री जयशंकर, सीबीआय संचालक, माजी लष्करप्रमुखांच्या कुटुंबीयांना SIR नोटीस; नेमकं प्रकरण काय?

IND A vs AUS A: CSK चा माजी स्टार खेळाडू आता भारतीय संघाचा हेड कोच! ऑस्ट्रेलियाविरुद्ध ऋतुराज-पडिक्कलच्या संघांना देणार ट्रेनिंग

SCROLL FOR NEXT