submarine tourism project  esakal
महाराष्ट्र बातम्या

महाराष्ट्रातून गुजरातला जाणारा पाणबुडी प्रकल्प आहे तरी काय?, कोकणचं होणार मोठं नुकसान

मागच्या काही दिवसांपासून एकापाठोपाठ एक असे प्रकल्प गुजरातला नेले जात आहेत. हे कमी की काय, म्हणून आता सिंधुदुर्गातील पर्यटनाचा मोठा प्रकल्प गुजरातला जाणार आहे.

सकाळ डिजिटल टीम

Maharashtra Project Shifted to Gujarat : मागच्या काही दिवसांपासून एकापाठोपाठ एक असे प्रकल्प गुजरातला नेले जात आहेत. हे कमी की काय, म्हणून आता सिंधुदुर्गातील पर्यटनाचा मोठा प्रकल्प गुजरातला जाणार आहे.

२०१८ मध्ये सिंधुदुर्गामध्ये पहिल्या पाणबुडी प्रकल्पाची घोषणा करण्यात आलेली होती. त्यापूर्वीही पर्यटन क्षेत्राला चालना देणाऱ्या अनेक प्रकल्पांची घोषणा करण्यात आलेली. मात्र अद्याप कोणताही मोठा प्रकल्प पूर्णत्वास गेलेला नाही. सिंधुदुर्गच्या निवती रॉक्सजवळील समुद्रामध्ये पाणबुडी प्रकल्प येणार होता. परंतु हा प्रकल्प गुजरातला जाण्याची चिन्हं निर्माण झाली आहेत.

२०१८ मध्ये महाराष्ट्राच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात पर्यटन विकासासाठी १ हजार कोटींच्या निधीची तरतूद करण्यात आलेली होती. सिंधुदुर्गमधील प्रकल्पाच्या माध्यमातून पर्यटकांना खोल समुद्राच्या पाण्यातील अंतरंग अनुभवता येणार होते. आता हा प्रकल्प गुजरातच्या द्वारका येथे होणार आहे. गुजरात सरकारने त्यासाठी माझगाव डॉक लिमिटेडसोबत करार केला आहे.

गुजरात टुरिझमचे व्यवस्थापकीय संचालक पारधी यांनी सांगितलं की, या प्रकल्पामुळे पर्यटन क्षेत्राला चालना मिळणार आहे. तर एमएलडीचे अध्यक्ष संजीव सिंघल यांनी सामंजस्य करारावर स्वाक्षरी झाल्याचं नमूद केलं. टाईम्स ऑफ इंडियाने यासंदर्भातील वृत्त दिले आहे.

कशी आहे पाणबुडी?

द्वारकेत उभा रहात असलेल्या प्रकल्पातील पाणबुडी ३५ टन वजनाची असून ३० प्रवाशांची क्षमता असणारी आहे. समुद्रामध्ये ३०० फूट खोल जावून निसर्गाचं अंतरंग अनुभवता येणार आहे. हाच प्रकल्प सिंधुदुर्ग जिल्ह्यात होणार होता. परंतु आता गुजरामध्ये होणार असल्याचं संगितलं जात आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Latest Maharashtra News Updates : आज काँग्रेस करणार महात्मा गांधीच्या पुतळ्याचे रक्षण

Lottery Scam : लॉटरीच्या नावाखाली दाम्पत्याने 600 लोकांना 40 कोटींचा घातला गंडा; लोकांनी 5 ते 10 लाखांपर्यंत केली होती गुंतवणूक

Maharashtra Rain Update News : राज्यात पुन्हा मुसळधार पाऊस, पुढील पाच दिवस महत्वाचे; ११ जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट जारी

IT Park:'जमीन पसंत पडेना, आयटी पार्क होईना'; प्रशासनाचा कागदी खेळ, कृषि महाविद्यालयला पर्यायी प्रस्ताव मान्य नाही

Indian Railways: मिनिटाला निघणार दीड लाख तिकिटे; रेल्वे प्रशासनाचा महत्त्वपूर्ण निर्णय,आरक्षण केंद्रातील यंत्रणेत बदल

SCROLL FOR NEXT