Loan
Loan 
महाराष्ट्र

तब्बल चार नव्हे, तर सहा लाख कोटींचे राज्यावर कर्ज!

सकाळ न्यूज नेटवर्क

राज्यातील सर्व विकासप्रकल्पांच्या आढावा बैठकीत धक्‍कादायक वास्तव आले सामोरे
मुंबई - राज्यावर ४.७१ लाख कोटी रुपयांचे कर्ज असल्याचे दाखवले जात असले, तरी प्रत्यक्षात ते ६.७१ लाख कोटी रुपये इतके असल्याची धक्‍कादायक माहिती समोर आली आहे. 

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज मंत्रालयात सर्व विकासप्रकल्पांच्या सद्यःस्थितीचा आढावा घेतला. या वेळी मंत्री जयंत पाटील, छगन भुजबळ उपस्थित होते.

राज्यावर ४.७१ लाख कोटींचे कर्ज असल्याचे राज्याच्या अर्थसंकल्पात म्हटले आहे. मात्र सरकारच्या मालकीच्या इतर कंपन्या व महामंडळे यांच्याकडे दोन लाख कोटींचे कर्ज आहे. हे कर्ज अर्थसंकल्पात ‘ऑफबजेट’ दाखवण्यात आले आहे. त्यात महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ, एमएमआरडीए, म्हाडा, सिकॉम यांसारख्या कंपन्यांचा समावेश आहे.

या सरकारी कंपन्यांनी राज्यात विविध प्रकारचे हजारो कोटींचे प्रकल्प हाती घेतले आहेत. त्यात समृद्धी महामार्ग, बुलेट ट्रेन आणि मेट्रो प्रकल्पांचा समावेश आहे. या प्रकल्पांसाठी या कंपन्यांनी राज्य सरकारच्या संमतीनेच कर्ज काढले आहे. मात्र हे कर्ज राज्याच्या मूळ अर्थसंकल्पात दाखविले जात नाही. त्यामुळे राज्यावर ४.७१ लाख कोटींचे नव्हे, तर ६.७१ लाख कोटींचे कर्ज असल्याची माहिती समोर आली आहे. नियमानुसार हे दोन लाख कोटींचे कर्ज असले, तरी त्याचे दायित्व प्रत्यक्षपणे राज्य सरकारकडेच आहे. अशा विपरीत परिस्थितीत राज्य सरकारचा आर्थिक कारभार सांभाळण्याची जोखीम महाविकास आघाडी सरकारवर आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sangli Lok Sabha: "विशाल पाटलांवर शिवसेनेचा अन्याय"; भाजपचे केंद्रीय मंत्री काय बोलून गेले...

Raghuram Rajan: संपत्ती वितरणावर रघुराम राजन यांचे वक्तव्य चर्चेत; म्हणाले, ''श्रीमंतांवर कर...''

KKR vs DC : कोलकत्याच्या मार्गात दिल्लीचा अडथळा! सुनील नारायणचा पुन्हा दिसणार ‘वन मॅन शो’.... की जेक फ्रेसर मॅर्कगर्क घालणार तांडव

Latest Marathi News Live Update: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची आज सोलापुरात सभा

दहा मिनिटांमध्ये लिहिलेल्या मंगलाष्टका अन् मोहन जोशींचा किस्सा; 'असा' शूट झाला होता राधा-घनाच्या लग्नाचा एपिसोड

SCROLL FOR NEXT