Uddhav Thackeray vs Ravi Rana esakal
महाराष्ट्र बातम्या

...तर उद्धव ठाकरेंची पण चौकशी करा; रवी राणांची खळबळजनक मागणी

शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांना ईडीनं नुकतीच अटक केली त्यानंतर आज कोर्टानं त्यांना ती दिवसांची ईडी कोठडी सुनावली.

सकाळ डिजिटल टीम

मुंबई : शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांना ईडीनं नुकतीच अटक केली त्यानंतर आज कोर्टानं त्यांना ती दिवसांची ईडी कोठडी सुनावली. दरम्यान, शिवसेनेच्या अनेक नेत्यांची अशा घोटाळ्यांमध्ये नावं येत असल्यानं जर या सर्वांची लिंक मातोश्रीपर्यंत जात असेल तर उद्धव टाकरेंची देखील चौकशी करा, अशी खळबळजनक मागणी अपक्ष आमदार रवी राणा यांनी केली आहे. (so investigate Uddhav Thackeray too Sensational demand of MLA Ravi Rana)

राणा म्हणाले, "ईडी एक सक्षम यंत्रणा असून भ्रष्टाचाराच्या मुद्द्यांवर अनेक वर्षांपासून ईडी, सीबीआय काम करत आहे. त्यामुळं मला असं वाटतं की, ज्या राज्यांमध्ये सरकारमधील लोकांनी घोटाळे केले. तसेच ज्या सरकारांनी घोटाळेबाजांना पाठीशी घातलं अशा लोकांवर करवाईसाठी आपण ईडीकडं नेहमी तक्रारी करतो. ईडी ही सक्षम यंत्रणा असल्यानं ज्या प्रकारे त्यांनी संजय राऊतांना अटक केली. त्याचप्रमाणे भविष्यात अनिल परब देखील गजाआड जातील. पण या सर्वांच्या लिंक जर मातोश्रीवर जात असतील उद्धव ठाकरेंशी त्यांची लिंक लागत असेल तर उद्धव ठाकरेंची देखील चौकशी झाली पाहिजे"

दरम्यान, शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांना विशेष पीएमएलए कोर्टानं ४ ऑगस्टपर्यंत तीन दिवसांची ईडीची कोठडी सुनावली. त्यामुळं राऊत यांना आता ईडीच्या कोठडीत रहावं लागणार आहे. ईडीनं रविवारी तब्बल ९ तासांच्या चौकशीनंतर त्यांना रात्री उशीरा अटक केली. त्यानंतर त्यांना आज कोर्टात हजर करण्यात आलं होतं.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Cabinet Decision: राज्याच्या कृषि विभागात चार पदांच्या निर्मितीस मान्यता, राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीतील ८ मोठे निर्णय

Manoj Jarange Patil: मनोज जरांगे-पाटील यांच्या स्वागताच फलक फाडला; मसुरमध्ये मराठा बांधवांचा रास्तारोको - गुन्हा दाखल करण्याची मागणी

हास्यजत्रेच्या सेटवर विराज जगतापवर संतापलेले सचिन गोस्वामी; समजावायला आलेली प्राजक्ता माळी, काय होतं कारण?

Marathi News Live Updates : शिवसेना पक्षचिन्हाबाबत सुप्रीम कोर्टात सुनावणी, कपिल सिब्बल यांचा युक्तिवाद सुरु

Miraj News : नामकरणाचा श्रेयवाद पेटला! प्रशासकीय इमारतीला डॉ. आंबेडकरांचे नाव, तर सभागृहाला छत्रपती संभाजी महाराजांचे नाव देण्याचा ठराव मंजूर; सत्ताधारी-विरोधक भिडले

SCROLL FOR NEXT