Police ASI

 
esakal
महाराष्ट्र बातम्या

पोलिसांचीच चोरट्याला मदत! ९० हजारांची पगार असलेल्या सहायक फौजदारानंतर आता ७० हजारांची पगार असलेला पोलिस गाडीचा चालक शिपाई पण निलंबित, वाचा..

बाजारभावापेक्षा कमी दराने सोने देण्याच्या बहाण्याने सांगलीतील एका शेतकऱ्याची रेकॉर्डवरील गुन्हेगारांच्या टोळीने २८ लाखांची फसवणूक केली. यात गुन्हेगारांना सोलापुरातील सलगर वस्ती पोलिस ठाण्यातील सहायक पोलिस उपनिरीक्षक (एएसआय) अतुल सिद्रामप्पा न्यामणे (वय ५५) व पोलिस गाडीचा चालक आकाश राठोड (वय ४१) यांनी मदत केल्याचे निष्पन्न झाले.

तात्या लांडगे

सोलापूर : बाजारभावापेक्षा कमी दराने सोने देण्याच्या बहाण्याने सांगलीतील एका शेतकऱ्याची रेकॉर्डवरील गुन्हेगारांच्या टोळीने २८ लाखांची फसवणूक केली. यात गुन्हेगारांना सोलापुरातील सलगर वस्ती पोलिस ठाण्यातील सहायक पोलिस उपनिरीक्षक (एएसआय) अतुल सिद्रामप्पा न्यामणे (वय ५५) व पोलिस गाडीचा चालक आकाश राठोड (वय ४१) यांनी मदत केल्याचे निष्पन्न झाले. चालकास शहर गुन्हे शाखेने अटक केली असून, त्याला न्यायालयाने एक दिवसाची पोलिस कोठडी ठोठावली आहे. या दोघांनाही पोलिस आयुक्तांनी निलंबित केले आहे.

सांगलीतील खानापूर तालुक्यातील बलवडी येथील शेतकरी अमर सुनील तुपे (वय ३०) यांना टोळीप्रमुख लखन रामचंद्र ठोंबरे (वय ३४, रा. विटा, जि. सांगली) याने बाजारभावापेक्षा ५ हजार रुपये प्रतितोळा कमी दराने बिलासह सोने देण्याचे आमिष दाखवले. या आमिषाला बळी पडून तुपे यांनी जानेवारीत सहा लाख रुपये दिले होते. त्यानंतर रेल्वेने सोने येणार असल्याचे सांगून लखन ठोंबरेने तुपे यांना २ एप्रिलला सोलापूर रेल्वे स्टेशनमागील गेटसमोरील रस्त्यावर बोलावले. त्याठिकाणी तुपे यांनी ठोंबरेला २२ लाख रुपये रोख दिले. त्याचवेळी तेथे अचानक पोलिस गाडी आली व संशयितांना घेऊन गेली. याबद्दल संशय आल्याने तुपे यांनी सदर बझार पोलिसांत फसवणूक झाल्याची फिर्याद दिली होती.

हा गुन्हा क्राईम ब्रॅंचकडे वर्ग झाला. पोलिस उपनिरीक्षक मनोज मोरे यांनी तपास हाती घेतला आणि सोलापुरातील अवंती नगरातून मुख्य संशयित लखन ठोंबरेला ताब्यात घेतले. त्याच्याकडील चौकशीनंतर मध्यस्थी करणारा हरी मोहन केकडे (वय ५०, रा. वैराग, बार्शी), सहायक फौजदार अतुल सिद्रामप्प न्यामणे यास अटक केली. त्यानंतर पोलिसांनी रितेश कांबळे व ज्ञानेश्वर अवघडे यांनाही अटक केली. पण, फिर्यादीने पोलिसांना सांगितल्याप्रमाणे दुसरा पोलिस कोण होता, याचा तपास झाला. त्यावेळी पोलिस गाडी घेऊन आलेला चालक राठोडचाही गुन्ह्यातील सहभाग समोर आला. सध्या सर्व संशयित पोलिस कोठडीत आहेत.

ठोंबरेच्या गाडीत पोलिसांचा लाल-निळा दिवा

आमिष दाखवून लोकांना फसवणाऱ्या टोळीचा प्रमुख लखन ठोंबरे याच्याकडे ३५ ते ४० लाखांची कार आहे. कारला त्याने गॉगल ग्लास (काळी काच) बसवली आहे. कारमध्ये वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांच्या गाडीचा लाल-निळा दिवा आढळला. गुन्ह्यात पोलिसांनी त्याची १०० क्रमांक असलेली गाडी जप्त केली आहे. धक्कादायक बाब म्हणजे, ९० हजार रुपये पगार असलेला सहायक फौजदार न्यामणे व ८० हजार पगारदार चालक राठोड यांनी ठोंबरेला यापूर्वीही सात-आठवेळा मदत केल्याचे पोलिस सूत्रांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Video: दिल्लीच्या आंदोलनात पुन्हा हिंसा! तरुणांकडून दगडफेक; पोलिसांकडून लाठीचार्ज, अश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या

Devala News : विवाहितेने दोन लहान मुलींसह गावाबाहेरच्या विहिरीत उडी टाकून संपविले जीवन

Sonam Wangchuk: रुग्णालयातून सोनम वांगचुक यांचा पहिला व्हिडिओ, सरकारला दिला 'असा' प्रस्ताव, भावनिक प्रतिक्रिया समोर

Pune Mechanical Parking Demolition: संभाजी उद्यानातील अडीच कोटींचे मेकॅनिकल पार्किंग जमीनदोस्त; महापालिकेचा लोखंडी सांगडा हटविण्याचा प्रस्ताव स्थायी समितीपुढे

Mahagaon Bribe Case : अंगणवाडी मदतनीस नियुक्तीसाठी लाचेची मागणी; महिला व बाल विकास प्रकल्प अधिकारी एसीबीच्या जाळ्यात

SCROLL FOR NEXT